कासिमखानी मस्जिद येथे ईद मिलन व मस्जिद परिचय कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

कासिमखानी मस्जिद येथे ईद मिलन व मस्जिद परिचय कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

नगर - जमाअत-ए-इस्लामी हिंद, अहमदनगर तर्फे ईद मिलन व मस्जिद परिचय चा कार्यक्रम कासिमखानी मस्जिद, कलेक्टर कचेरी जवळ, अहमदनगर येथे आयोजित कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
प्रास्ताविकात डॉ. इक्राम खान काटेवाला यांनी सांगितले की आपापसातील गैरसमजुती व धर्माचा अभ्यास नसल्यामुळे होणारे गैरसमज मानवा मानवातील दरी वाढवीत आहे.
ईद, रमजान व रोजा हा मानवाला आपल्यामध्ये परीवर्तन करण्याचे प्रशिक्षण देतो, वंचितांचा विचार करुन देणारी विचारसरणी देतो, आपल्या आचरणात योग्य बदल करण्याचे प्रशिक्षण देतो. स्वार्थ व शोषणरहीत मानवी समाज निर्माण करणे अभिप्रेत आहे. द्वेष, मत्सरचा त्याग करुन बंधुभाव निर्माण करणे आजची गरज आहे.
कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी सांगितले की रोजा व पवित्र रमजान चा महीना असुनसुध्दा धर्माभ्यास नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात तरुण मुले अफवांना बळी पडत आहे व त्यांचे आयुष्य उध्वस्त होत आहे. तरुणांना योग्य दिशा मिळावी यासाठी असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे.
पत्रकार सुधीर लंके यांनी राजर्षी शाहु महाराज व छ्त्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देत महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची माहीती दिली.
बाळासाहेब बोराटे (माजी विरोधी पक्ष नेता अहमदनगर महानगरपालिका अहमदनगर), सचिन जाधव (माजी सभापती, स्थायी समिती अहमदनगर महानगरपालिका अहमदनगर), शिरीष बिमन, सनदी लेखापाल, लंकेश हरबा आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना जातीय सलोख्यावर व हिंदु-मुस्लिम एकतेवर भर दिला. सर्व मान्यवरांनी मुस्लिम समाजातील लोकांचे महिनाभर रोजा(उपवास) ठेवल्याबद्दल अभिनंदन केले व ईदच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला सर्व समाजातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान सर्वांनी शिरखुर्म्याचा आस्वाद देखील घेतला.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जमाअत-ए-इस्लामी हिंद, अहमदनगर चे स्थानिक अध्यक्ष मुश्ताक सर यांनी केले. शेवटी जमाअत-ए-इस्लामी हिंद, अहमदनगर च्या विनंतीला मान देवुन या कार्यक्रमाला नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित राहील्याबद्दल आणि हा कार्यक्रम आनखीनच गोड केल्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले.
आभार प्रदर्शन जमाअत-ए-इस्लामी हिंद, अहमदनगर चे ज्येष्ठ सदस्य मुस्तफा लांडगे यांनी केले.
याप्रसंगी जमाअत-ए-इस्लामी हिंद, अहमदनगर चे सर्व सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!