रोटरीच्यावतीने ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अंतर्गत माजी सैनिकांचा सत्कार

गाव करील ते राव काय करील : माधव देशमुख

रोटरीच्यावतीने ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अंतर्गत माजी सैनिकांचा सत्कार

रोटरी परिवर्तन ग्राम अंतर्गत पिंपळगाव वाघा येथे ग्रामसभा घेतली. मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत माजी सैनिकांचा रोटरी क्लबच्या वतीने शाल देऊन सन्मान केला. याप्रसंगी रोटरीचे अध्यक्ष माधव देशमुख, सचिव दिपक गुजराथी, युथ आयकॉन महेश गोपाळकृष्ण, सरपंच सौ.सुरेखाताई नाट, दत्ताजी उर्मोडे, मुख्याध्यापक शेजुळ मॅडम आदि.


  • अहमदनगर - गावाचा विकास हा कोणा एकट्याची जबाबदारी नाही, ती प्रत्येकाने पार पाडली पाहिजे. जेव्हा सर्व गावकरी एकत्र येऊन एखादा प्रोजेक्ट हाती घेतात ते कार्य पुर्णत्वास जाते. त्यामुळेच म्हणतात की ‘गाव करील ते राव काय करील’ आपल्या गावाचा विकास आपण केला पाहिजे. ⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘

कृतज्ञता भाव -

गावातील शिक्षक, माजी सैनिक, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, सरकारी कर्मचारी, उद्योजक हे आपआपल्या परिने सहभाग देत असतात. आज देशसेवा करणार्‍या माजी सैनिकांचा सन्मान करुन त्यांच्याप्रती कृतज्ञता भाव व्यक्त केला आहे. 

पुढाकार घेणे गरजेचे -

गावातील कमरतता ओळखून त्या पुर्ण करण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेणे गरजेचे आहे आणि इतरांनी त्यांना साथ दिल्यास आपले गाव संपुर्ण नक्कीच होऊ शकते. याची उदाहरणे आपल्याकडेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पद्मश्री पोपटराव पवार यांच्या देता येतील. 

विकासात योगदान -

रोटरी क्लबनेही ‘रोटरी परिवर्तन ग्राम’ उपक्रमांतर्गत गावांच्या विकासात योगदान देत आहे, त्याचा लाभ गावकर्‍यांनी घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष माधव देशमुख यांनी केले.

सन्मान -

रोटरी परिवर्तन ग्राम अंतर्गत पिंपळगाव वाघा येथे ग्रामसभा घेतली. मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत माजी सैनिकांचा रोटरी क्लबच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान केला. याप्रसंगी रोटरीचे अध्यक्ष माधव देशमुख, सचिव दिपक गुजराथी, युथ आयकॉन महेश गोपाळकृष्ण, सरपंच सौ.सुरेखाताई नाट, दत्ताजी उर्मोडे, मुख्याध्यापक शेजुळ मॅडम आदि उपस्थित होते.

शासनाच्या योजना -

याप्रसंगी सरपंच सौ.सुरेखाताई नाट म्हणाल्या, गावात शासनाच्या विविध योजना ग्रामस्थांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शासनाच्या योजना, निधी बरोबर सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गावातील विविध कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

विकासाची नांदी  -

रोटरी क्लबने आमच्या गावात येऊन विकास कामास केलाला प्रारंभ हा विकासाची नांदी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. सचिव रो.दिपक गुजराथी यांनी रोटरी क्लबच्यावतीने गावात राबविण्यात येणार्‍या उपक्रमांची माहिती देऊन गावाचा सर्वांगिण विकासासाठी रोटरी आपल्याबरोबर राहिल असे सांगितले.

पाहणी -

यावेळी रोटरीच्या पदाधिकारी, सदस्यांनी गावातील शाळा, अंगणवाडीस भेट देऊन पाहणी केली गावकर्‍यांच्या गरजा समजाऊन घेतल्या परिवर्तन ग्राम मध्ये करण्यात येणार्‍या कामाची आखणी केली. बायोगॅस प्रकल्प हाती घेतला त्याचेही सर्वेक्षण करण्यात आले. शेवटी दत्ताजी उर्मोडे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!