अलि पब्लिक स्कूल व युनिवर्सल एज्युकेशन ट्रस्टच्या मोफत दंत तपासणी व उपचार तसेच रक्तदान शिबीरास प्रतिसाद

अलि पब्लिक स्कूल व युनिवर्सल एज्युकेशन ट्रस्टच्या मोफत दंत तपासणी व उपचार तसेच रक्तदान शिबीरास प्रतिसाद

तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरी रक्तदाना शिवाय

पर्याय नाही : नगरसेवक बाळासाहेब बोराटे

Response to Ali Public School and Universal Education Trust's free dental check-up and treatment and blood donation camp

अलि पब्लिक स्कूल व युनिवर्सल एज्युकेशन ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून बेग पटांगण, जुना मंगळवार बाजार येथे मोफत दंत तपासणी व उपचार तसेच रक्तदान शिबीरप्रसंगी पोलिस उपाधिक्षक अनिल कातकडे, पो.नि.चंद्रशेखर यादव, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दिलीप सातपुते, ट्रस्टचे चेअरमन शेख अब्दुल वाजिद नसिमोद्दीन.


  • अहमदनगर - आज आरोग्य क्षेत्रात नवनवीन बदल होत आहे, नवनवीन तंत्रज्ञान येत आहे, त्यामुळे उपचार करणे सोपे जात आहे. परंतु तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरी आजपर्यंत रक्त बनवू शकलेले नाही, त्यामुळे रक्तदानाशिवाय रक्ताची गरज पूर्ण होऊ शकत नाही. तेव्हा प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे. ❁❁❁❁❁❁

 सामाजिक बांधिलकी जपली -

आपल्या एकाच्या रक्तदानाने तीन जणांचे प्राण वाचू शकतात. त्यासाठी अशा रक्तदान शिबीराचे नियमित आयोजन होणे गरजेचे आहे. आज अलि पब्लिक स्कूल व युनिवर्सल एज्युकेशन ट्रस्टने रक्तदान व मोफत दंत तपासणी शिबीराचे आयोजन करुन सामाजिक बांधिलकी जपली आहे. अशा उपक्रमाचा गरजूंना मोठा फायदा होतो. सर्वसामान्यांसाठी मोफत शिबीर आधार ठरत आहे, असे प्रतिपादन नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केले.

मोफत दंत तपासणी | रक्तदान शिबीर -

अलि पब्लिक स्कूल व युनिवर्सल एज्युकेशन ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून बेग पटांगण जुना मंगळवार बाजार येथे मोफत दंत तपासणी व उपचार तसेच रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

मान्यवर -

याप्रसंगी पोलिस उपाधिक्षक अनिल कातकडे, पो.नि.चंद्रशेखर यादव, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, सभापती गणेश कवडे, दिलीप सातपुते, किरण काळे, हाजी शौकत तांबोळी, प्रविण सप्रे, माजी नगरसेवक फैय्याज केबलवाले, भगवान फुल सौंदर, संतोष गैनप्पा,अभिषेक कळमकर, नगरसेविका सुवर्णा जाधव, बाबासाहेब सानप, नगरसेवक आसिफ सुलतान, कासमभाई, हाजी इरफान,डॉ.निलेश वैद्य, डॉ.ओंकार एस, दानिश शेख, डॉ.परवेज आशरफी, राजू जहागिरदार, बिशप तानाजी पाडाळे, उजेर पहेलवान, मुफ्ती अल्ताफ, हाजी फिरोज शफी खान, तारीक कुरेशी, मोहसीन सय्यद, अज्जू शेख, इम्रान पठाण, वसीमभाई आदि उपस्थित होते.

दंत रुग्णांची तपासणी -

या शिबीरात रक्तसंकलनाचे कार्य मनपाच्या कै.बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलच्या रक्तपेढीने केले. यात 10 जणांनी रक्तदान केले तर दंत रुग्णांची तपासणी युनिव्हर्सल डेंटल केअरच्यावतीने करण्यात आली. यामध्ये 270 रुग्णांची तपासणी करुन उपचार करण्यात आले. पुढील उपचार हे सवलतीच्या दरात करण्यात येणार आहेत.

लोकांचा प्रतिपाद -

प्रास्तविक युनिवर्सल एज्युकेशन ट्रस्टचे चेअरमन शेख अब्दुल वाजिद नसिमोद्दीन म्हणाले, सर्वसामान्य कुटूंबातील मुलांना आधुनिक शिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न ट्रस्टच्या माध्यमातून केला जात आहे. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यात येत असते. समाजातील सर्व स्तरातील लोकांचा प्रतिपाद मिळत असल्याने आम्हालाही असे उपक्रम राबविण्यास प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले.

उपस्थित -

यावेळी अलतमश जरीवाला, वसीमभाई, असद इराणी, बशीर शेख, नवेद भाई, अजीम राजे, नईम जहागिरदार, नईम सरदार, फारुक वकिल, संतोष काळे, सलमान मुसा शेख, अरबाज शेख, अबुजर मोमीन, पांचपीर चावडी यंग ग्रुपचे सदस्य आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन अंन्जर अन्वर खान यांनी केले तर आभार महेबूब शेख यांनी मानले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!