शहरात नियोजनबद्ध रस्ता कॉंक्रिटीकरणाची कामे सुरू - महापौर रोहिणी शेंडगे

नागापूर चक्रधर स्वामी मंदिर रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न

शहरात नियोजनबद्ध रस्ता कॉंक्रिटीकरणाची कामे सुरू - महापौर रोहिणी शेंडगे


अहमदनगर : मनपाच्या माध्यमातून शहरांमध्ये गेल्या दोन वर्षात नियोजनबद्ध व कायमस्वरूपी विकास कामे सुरू आहे. दर्जेदार रस्त्याची निर्मिती व्हावी यासाठी रस्ता कॉंक्रिटीकरणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतले आहे. प्रभाग क्रमांक ७ मध्ये विविध विकास कामासाठी नगरसेवकांनी पाठपुरावा केला त्यामुळे या परिसराच्या विकासासाठी मोठ्या निधी उपलब्ध करून दिला आहे. प्रभागातील सर्वच विकासाची कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण होतील.  अमृत पाणी योजनेचे काम मार्गी लागले असल्यामुळे शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे, शहरामध्ये विविध विकासाची कामे मंजूर असून ती कामेही तातडीने मार्गी लागतील या माध्यमातून आपले नगर शहर हे विकसित शहर म्हणून ओळखले जाणार आहे असे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.

    नागापूर गावठाण येथिल श्री चक्रधर स्वामी मंदिर कमान ते लक्ष्मी माता मंदिरा पर्यंतचा रस्ता कॉंक्रिटीकरण करण्याचे काम नगरसेवक अशोकराव बडे यांच्या प्रयत्नांतून तसेच वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाले असून त्या कामाचे उदघाटन श्री चक्रधर स्वामी मंदिराचे महंत प,पु, वाल्हेराज बाबा बिडकर तसेच महापौर रोहिणी शेंडगे यांचे शुभहस्ते करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती गणेश कवडे, माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, सचिन शिंदे, नगरसेवक अशोकराव बडे, नगरसेविका रिता भाकरे, भागचंद भाकरे, पंढरीनाथ सप्रे, भाऊसाहेब खेडकर, राजेंद्र कांबळे, बाबासाहेब पालवे, विश्वास भाकरे, रमाकांत शर्मा, रमेश पाचारणे, आदित्य शर्मा, विकास कांबळे, रमाकांत ठोंबे, सुनिता भाकरे, लता शिंदे, निकिता भाकरे, साली पाटोळे, सोनल भिंगारदिवे, मंगल भिंगारदिवे, मंदिरा जाधव, रंजना भाकरे, अलका पाटोळे, मंगल पाटोळे, उषा दुबे, सुमित्रा शर्मा आदी उपस्थित होते.

  नगरसेवक अशोक बडे म्हणाले की, नागापूर येथील श्री चक्रधर स्वामी मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शन घेण्यासाठी येत असतात या मंदिरासमोरील रस्त्याचे काम मार्गी लागावे यासाठी आम्ही नगरसेवकांनी महापौर रोहिणी शेंडगे यांच्याकडे पाठपुरावा केला, त्यानुसार आज रस्ता कॉंक्रिटी करण्याचे काम सुरू झाले आहे, नागापूर परिसरातील विकासाचे काम पूर्ण व्हावे यासाठी दोन कोटी रुपयांची कामे मंजूर आहेत ती लवकरच सुरू होतील असे ते म्हणाले.

  नगरसेविका रिता भाकरे म्हणाल्या की, नागापूर हे एक गाव असून येथील विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी आम्ही नगरसेवकांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे तसेच पुढील काळामध्ये सर्व विकासाची कामे मार्गी लागले जातील असे त्या म्हणाल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!