अदानी समुहाच्या अंबुजा व एसीसी सिमेंट मार्फत जिल्ह्यातील बांधकाम ठेकेदार गौरवोत्सव संमेलनाचे आयोजन
अदानी समुहाच्या अंबुजा व एसीसी सिमेंट मार्फत जिल्ह्यातील बांधकाम ठेकेदार गौरवोत्सव संमेलनाचे आयोजन करणायत आले होते. यावेळी अहमदनगर ब्रांच इंचार्ज भरत फरतडे, सेल्स ऑफिसर सचिन ठाकरे, दक्षिण महाराष्ट्र टेक्निकल हेड निलेश मालवीया, दक्षिण महाराष्ट्र मार्केटिंग हेड मृत्युंजय प्रकाश सिंग, टेक्निकल इंजिनिअर कुणाल ताकपेरे, इंजिनअर अमरेश खमीतकर, व टेक्निकल इंजिनिअर संदिप खामकर यांच्यासह जिल्हाभरातील बांधकाम ठेकेदार व डीलर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच ठेकेदारांसाठी असलेल्या कंपनीच्या अंबुजा अभिमान व एसीसी अतूट बंधन 2.0 याविषयी माहिती दिली. पश्चिम भारत टेक्निकल हेड जिग्नेश गांधी यांनी अदानी ग्रुपमधील दोन्ही सिमेंटच्या गुणवत्तेविषयी माहिती दिली. अदानी ग्रुपच्या विविध क्षेत्रातील कंपनीबद्दल विस्तृतपणे सांगितले व अदानी ग्रुपच्या भविष्यातील वाटचालीबद्दल सांगितले. दक्षिण महाराष्ट्र मार्केटिंग हेड मृत्युंजय प्रकाश सिंग यांनी देखील ठेकेदारांना मार्गदर्शन केले. यावेळी अदानी सिमेंट द्वारे ठेकेदारांना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल व सिमेंटच्या उपयोगाबद्दल अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. दक्षिण महाराष्ट्र टेक्निकल हेड निलेश मालवीया यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना आखली. इंजिनअर अमरेश खमीतकर यांनी सूत्र संचालन केले. यावेळी ठेकेदार व डिलिर यांचेकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला व मनोरंजित कार्यक्रमाचे स्वागत करण्यात आले.

