Homeशिक्षक हाच खऱ्या अर्थाने उज्वल भविष्याचे मानकरी : मौलाना खालील शेखशिक्षक हाच खऱ्या अर्थाने उज्वल भविष्याचे मानकरी : मौलाना खालील शेख शिक्षक हाच खऱ्या अर्थाने उज्वल भविष्याचे मानकरी : मौलाना खालील शेख 0 LOKHEET September 12, 2023 सलाबतपुरच्या रयत विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजराअहमदनगर : देशाच्या जडणघडणीमध्ये शिक्षकांचे सर्वात मोठे योगदान आहे. त्यांच्याकडून झालेल्या ज्ञानदानामुळे विद्यार्थी हा घडला जातो. त्या माध्यमातूनच तो विद्यार्थी समाजात विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला जातो. शिक्षक हाच खऱ्या अर्थाने उज्वल भविष्याचे मानकरी व निर्माता आहे.शिक्षक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम करत असतात. त्या माध्यमातून प्रेरणा मिळत असते. आयुष्यामध्ये गुरुचे स्थान हे अत्यंत महत्त्वाचे असते. त्या माध्यमातून आपले जीवन मार्ग ज्ञानाने प्रकाशित करत योग्य दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा देत असतात. बालवयातच शिक्षकांच्या माध्यमातून योग्य संस्कार मिळण्याचे काम होत असते. त्यातूनच सुसंस्कृत पिढी निर्माण होते असे प्रतिपादन मौलाना खलील शेख यांनी केले. नेवासा तालुक्यातील रयत शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल, सलाबतपुर विद्यालयात देशाचे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिनानिमित मौलाना खलील शेख यांच्यावतीने शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाला कायम सढळ हातांनी मदत करणारे मौलाना खलील शेख होते. त्यांनी विद्यालयाला हुशार विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून शालेय साहित्याची भेट दिले. विद्या मंदिर हे सहाय्य देण्यासाठी एक मोठे आणि योग्य ठिकाण असल्याचे प्रतिपादन केले. कारण यातूनच भविष्य घडवणारी पिढी निर्माण होते.मौलाना खलील शेख म्हणाले की, समाजामध्ये शिक्षक हा एक महत्त्वाचा घटक आहे त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडण्याचे काम होत असते. शिक्षण क्षेत्रामध्ये अमुलग्रह बदल झाले असून त्यानुसार शिक्षक विद्यार्थ्यांना बौद्धिक ज्ञान देण्याचे काम करत असतात. त्यामुळेच विद्यार्थी हा आज सर्वोच्च पदापर्यंत पोहोचला आहे असे ते म्हणाले. पुढे ते म्हणाले विद्यार्थ्यांना विद्यालय हे हक्काचे व्यासपीठ आहे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी घडला जातो त्याला योग्य मार्गदर्शन मिळाल्यास यशाचे शिखर गाठले जाते. यासाठी विद्यार्थ्यांना गुरूच्या मार्गदर्शनाची खरी गरज असते. शिक्षक दिनानिमित मौलाना खलील शेख यांच्यावतीने शिक्षकांचा देखील सन्मान करण्यात आला. यावेळी शेषराव आहेर, नितीन कांबळे, प्रभारी मुख्याध्यापक नवनाथ इटकर, संदीप लाहिरे, अनिल शिंदे, सुनील पवार, चेमटे, मनोज आगरकर, संभाजी खराडे व वृषाली जमदाडे, स्मिता नलावडे, नीता राठोड, अर्चना विधाते, भाऊसाहेब जपे, ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शिक्षक दिनानिमित कार्यक्रमांचे नियोजनासाठी जपे मामांचे चांगली मदत झाल्याचे त्यांनी सांगितले. Tags शिक्षक हाच खऱ्या अर्थाने उज्वल भविष्याचे मानकरी : मौलाना खालील शेख Newer Older