मुनव्वर हुसेन छोटे खान यांना राष्ट्रीय भाषा शिक्षक पुरस्कार जाहीर
अहमदनगर : कौमी उर्दू शिक्षक कर्मचारी संघ भारत तर्फे 2023 साठीचा नॅशनल लँग्वेज टीचर अवॉर्ड म्हणजेच राष्ट्रीय भाषा शिक्षा पुरस्कार मुनव्वर हुसेन छोटे खान यांना नुकताच जाहीर करण्यात आला.हा पुरस्कार संपूर्ण देशातील निवडक शिक्षकांना दिला जातो.
तसेच शिक्षक भारती उर्दू संघटना, अहमदनगरचे जिल्हा सेक्रेट्री व इदारा अदबे इस्लामी अहमदनगर (उर्दू साहित्य संघटना) चे सेक्रट्री आहे. व त्यांनी त्यांचे आजोबा हिम्मत अहमदनगरी यांचे पुस्तक "नुरुलहुदा" 2016 मध्ये प्रकाशित केले असुन अहमदनगर जिल्ह्यात विविध साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रातील विविध उपक्रमात अग्रेसर असतात.
स्वत: उर्दू कवी आहे. त्यांना गुफ्तगू साहित्यिक संस्था, प्रयागराज तर्फे आधुनिक भारताचे गज़लकारासोबत "फिराक गोरखपुरी सम्मान" 2022 मिळालेला आहे.
राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय भाषा -
शिक्षक पुरस्कार पुढील महिन्यात त्यांना गालिब इनस्टट्यूट,दिल्ली येथे एका भव्य समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.त्यामुळे शिक्षण क्षेत्रात सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

