अहमदनगर : अरुणा आसिफ अली शैक्षणिक व सामाजिक महिला मंडळ अहमदनगर तर्फे मोहम्मदीया एज्युकेशन सोसायटी संचलित सावित्रीबाई फुले उर्दु प्राथमिक कन्या शाळा, मौलाना आझाद उर्दु मुलींचे हायस्कुल, मदर तेरेसा उर्दु ज्युनिअर कॉलेज, मासुमिया डि. एड. कॉलेज तसेच मासुमिया शिक्षण शास्त्र महाविद्यालय, मुकुंदनगर, अहमदनगर च्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन, रुमाल व पुष्पगुच्छ देऊन शिक्षक-गौरव गुणगण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक प्रमुख अब्दुस सलाम सर होते. प्रमुख अतिथी म्हणून महिला मंडळाच्या अध्यक्षा फरिदा भाभी व सदस्या आमिना भाभी, इकबाल भाई आदि उपस्थित होते.
इ.७वी च्या शिक्षक मुली शिक्षक दिना निमित्त झालेले शिक्षक, मौलाना आझाद हायस्कुलचे विद्यार्थी शिक्षक, मदर तेरेसा चे १२ वी चे विद्यार्थी शिक्षक, मासुमिया डि एड कॉलेजचे छात्र शिक्षक या सर्वांचा फरिदा भाभीच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डाँ. अब्दुस सलाम यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण केली व मनोगत व्यक्त केले. शिक्षाकांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास मुख्याध्यापक नौशाद सैय्यद, मुख्याध्यापिका फरहाना बाजी,दंडौती शकिला व इतर शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमास हसिब शेख यांनी परिश्रम घेतले.सुत्रसंचालन बहार बाजी यांनी केले. तलमीज सैय्यद यांनी आभार मानले.


