सामाजिक कार्यकर्त्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभाग समोर आत्मदहनाचा इशारा

सामाजिक कार्यकर्त्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभाग समोर आत्मदहनाचा इशारा; गैरकारभारप्रकरणी खांडगावच्या मुख्याध्यापकावर कारवाईची मागणी

A social activist warned of self-immolation in front of the Zilla Parishad Education Department

अहमदनगर : एक वर्षांपासून विभागीय चौकशी प्रस्तावित असलेल्या व महिला शिक्षिकांनी तक्रार केलेल्या खांडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय झरेकर यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 


वारंवार तक्रार करुन देखील कारवाई होत नसल्याने झरेकर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागा समोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. तर महिलांना त्रास देणाऱ्या त्या मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

खांडगाव (ता. पाथर्डी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिकांनी पोलीस अधीक्षक व महिला आयोग यांच्याकडे मुख्याध्यापकाच्या गैरवर्तनाबद्दल तक्रार केलेली आहे. त्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना देखील देण्यात आली आहे. राजकीय निवडणुकीत सहभाग घेऊन वृत्तपत्रात राजकीय बातम्या देणे, बदलीसाठी चुकीची कागदपत्रे सादर करून जिल्हा परिषदेची फसवणूक, ग्रामपंचायतच्या प्रशासकीय लेटरपॅडचा प्रशासकीय नोंद न करता गैरवापर, प्राथमिक शाळा खांडगावचा बनावट शिक्का वापरून त्यात खाडाखोड, माध्यमिक शिक्षण संस्था, जिल्हा परिषद यांना बनावट सह्यांचे संदर्भ/पुरावे सादर करणे, विद्यार्थी पटसंख्या ऑनलाईन शून्य असताना शालेय पोषण आहार आणि गणवेशासाठी खर्च करण्याचे गैरवर्तन खांडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक करत असल्याचा आरोप झरेकर यांनी केला आहे.


याबाबत सबळ पुरावे देऊन सुद्धा काही गैरप्रकाराबद्दल फौजदारी कारवाईची जिल्हा परिषद प्रशासनाकडे मागणी करुन देखील त्याकडे दुर्लक्ष करून एक वर्षांपासून फक्त विभागीय चौकशी प्रस्तावित करून त्यातही विलंब होत आहे. प्राथमिक शिक्षण अधिकारी सदर मुख्याध्यापकाला पाठिशी घालत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ऑनलाईन पटसंख्या भरताना झालेल्या गंभीर चुकीबद्दल लोहसर (ता. पाथर्डी) येथील मुख्याध्यपकांना निलंबित केले आहे. अशाच स्वरूपाची गंभीर तक्रार आणि इतर आरोप पुराव्यासहित केले असताना खांडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाला सुट दिली जात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. संबंधीत मुख्याध्यापकाचे तात्काळ निलंबन करुन त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणी झरेकर यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!