जिल्ह्यात कुपोषित मुक्त बालक अभियानास प्रारंभ; Malnutrition free child campaign started in the district

जिल्ह्यात कुपोषित मुक्त बालक अभियानास प्रारंभ
आनंद अचल गुरू फाऊंडेशन व उज्वल चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम
गरजू गरोदर महिलांना मोफत प्रोटीन पावडर वाटप सुरु

Malnutrition free child campaign started in the district

अहमदनगर : आनंद अचल गुरू फाऊंडेशन व उज्वल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जिल्ह्यात कुपोषित मुक्त बालक अभियान सुरु करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर आनंदधाम मध्ये बैठक पार पडली. या बैठकीत गरजू घटकातील गरोदर महिलांना संस्थेच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने मोफत प्रोटीन पावडर वाटपाचे नियोजन करण्यात आले.

Malnutrition free child campaign started in the district

प.पू. आचार्य आनंदऋषीजी महाराज व विरल दर्शनाजी महाराज यांच्या आशीर्वादाने अचल ऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या बैठकीसाठी आनंद अचल गुरू फाऊंडेशनचे अध्यक्ष कुंदनमल दर्डा, विलास पालरेशा, दिनेश कर्नावट, मनसुखलाल डुंगरवाल, उज्वल चैरिटेबल ट्रस्टचे उज्वला पालरेशा, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.कांतीलाल टाटीया, डॉ. प्रीतम चुत्तर (राहुरी), गौतम खटोड (बीड), सुनिल छाजेड, राजेंद्र छाजेड, आनंद छाजेड आदी उपस्थित होते.


उज्वला पालरेशा म्हणाले की, कुपोषितमुक्त समाजासाठी गर्भवती महिलांना प्रोटीन पावडर दिले जात आहे. यामुळे सदृढ नवजात बालक जन्माला येत असून, या उपक्रमास गर्भवती महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागातून प्रोटीन पावडरला मागणी वाढत असून, कुपोषण मुक्तीचा हा लढा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रभर प्रचार-प्रसार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.


कुंदनमल दर्डा म्हणाले की, संस्थेच्या माध्यमातून गेल्या सात वर्षापासून अपंग, कुपोषित मुलांसाठी आरोग्य सेवा पुरविल्या जात आहे. कुपोषित, अपंग मुले जन्माला येऊ नये, यासाठी गर्भवती महिलांना सकस आहार मिळण्याच्या उद्देशाने उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गरोदर महिलांना मोफत प्रोटीन पावडर देऊन भविष्याची सक्षम पिढी जन्माला येण्यासाठीचे कार्य सुरू आहे. या सामाजिक कार्याला हातभार लावण्याचे त्यांनी आवाहन केले.


सुनिल छाजेड म्हणाले की, महागाईच्या काळात सर्वसामान्य कुटुंबाला पोषण व सकस आहार मिळणे अवघड झाले आहे. गरोदर मातांना प्रोटीन पावडरद्वारे त्यांना व बाळांना पोषण मिळणार आहे. या अभियानातंर्गत जिल्हाभर प्रोटीन पावडर वाटप सुरु करण्यात आले असून, कुपोषित मुक्त बालक अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सहयोगाने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालय येथे पोषक आहार योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या चर्चासत्रात जिल्हा रुग्णालातील गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!