महफिले मुशायरा उत्साहात संपन्न..

महफिले मुशायरा उत्साहात संपन्न.. 

अहमदनगर- स्वतंत्रता सेनानी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त मखदूम सोसायटी व मराठा सेवा संघातर्फे कौमी एकता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये या सप्ताहाचा समारोप महफिले मुशायऱ्याने शनिवार दि. 9 डिसेंबर 2023 रोजी रात्री नऊ वाजता सर्जेपुरा येथील रहेमत सुलतान हॉल येथे महफिले मुशायरा चे आयोजन करण्यात आले होते. मौलाना अबुल कलाम आझाद महोत्सव समितीचे अध्यक्ष सय्यद खलील यांनी कार्यक्रमा विषयी माहिती दिली होती.

The gathering and Mushaira concluded with great enthusiasm.

यामुशायराच्या अध्यक्षस्थानी औरंगाबाद येथील शायर इतिहासकार लेखक मिर्झा अस्लम बेग हे असणार असून याचे दीप प्रज्वलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हाजी शौकत भाई तांबोळी यांच्या हस्ते होणार असुन प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष के के खान, मोहम्मदीया एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख कार्यवाह प्रा डॉ अब्दुस सलाम सर, मा. परिवहन अधिकारी शहा निजाम, चांद सुलतान हायस्कूलचे माजी प्रचार्य कादिर सर व सैफ अली सर, अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे अध्यक्ष सलीम खान पठाण, रहेमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनूस तांबटकर हे मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे महोत्सव समितीचे सचिव निसार बागवान यांनी सांगितले.

या मुशायरा मध्ये सैय्यद खलील, डॉ कमर सुरुर, जलगाव येथील अश्फाक मारूलवी, मुंबई येथील शहजान वसीम, जामखेड येथील शाकीर अहमद व अहमदनगर येथील बिलाल अहमदनगरी, सुलेमान अहमदनगरी, मुस्ताक सर, आसिफ सर, सलीम यावर, नफीसा ह्या, अर्क अहमदनगरी, शरीफ खान, मुन्नवर हुसेन हे आपले कविता सादर करणार असल्याचे मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या सचिव डॉ. कमर सुरूर यांनी सदर केल्या. प्रवेश विनामूल्य असल्याचे मखदूम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हे खान यांनी सांगितले होते.

तरी या साहित्यिक मेजवानी मुशायऱ्याच्या कार्यक्रमास रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!