अहमदनगर - अल करम सोशल अँड एज्युकेशनल सोसायटीच्या अलकरम हॉस्पिटल,एक्सरे लॅब, सोनोग्राफी व मॅटरनिटी नर्सिंग होमच्यावतीने प्रजासत्ताक दिवसानिमित्त सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत नालबंद खुंट येथील शेख साहब बिजनेस टाॅवर नालबंद मस्जिद समोर व अहमदनगर भुईकोट किल्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे शेरअली शेख यांनी सांगितले.
अलकरम सोसायटी वर्षानुवर्ष अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवत असते. त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक स्वातंत्रय दिन व प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबिर घेत असते. रक्तदान केल्याने हार्ट अटॅकची आशंक कमी राहते. कारण रक्तदान केल्याने रक्त पातळ होते. तसेच कॅन्सर व दुसऱ्या आजार होण्याची प्रमाणही कमी होते.असे अनेक फायदे रक्तदानामुळे असल्याने सर्वांनी स्वतः उत्स्फूर्तपणे रक्तदान करावे असे आवाहन समीर सय्यद व आर्शद सय्यद यांनी केले आहे. काही शंका निशंका असल्यास किंवा अधिक माहितीसाठी 9822590690- 9028289908- 99219914 92 या नंबर वर संपर्क करावे.असे तौफिक तांबोळी यांनी सांगितले.
Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.