मदर तेरेसा उर्दु ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उदघाटन संपन्न
अहमदनगर - आज प्रत्येकाची प्रतिकार शक्ती कमी होत आहे, विशेषत: मुलांमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात जाणवत आहेत. फार्स्ट फूड, व्यायामाचा अभाव या गोष्टी यासाठी कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे पालकांनी याकडे लक्ष देऊन मुलांना मैदानी खेळाकडे वळवून आणि सकस आहार दिला पाहिजे. शाळेत शिक्षक याबाबत जागृती करत असतात, परंतु पालकांनीही जबाबदारीने वागले पाहिजे.
आजच्या खेळ मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना निर्माण होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर आरोग्यही सुदृढ राहण्यास मदत होईल.अशा उपक्रमांचे नियमित काॅलेजच्यावतीने आयोजन करण्यात येत असल्याने विद्यार्थी प्रफुल्लित रहाते असे प्रतिपादन मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक डॉ.प्रा.अब्दुस सलाम सर यांनी केले.
मोहम्मदीया एज्युकेशन सोसायटी संचालित मदर तेरेसा उर्दु ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स फॉर गर्ल्सच्या वार्षिक क्रिडा स्पर्धांचे उदघाटन संस्थेचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह डॉ.प्रा. शेख अब्दुस सलाम सर यांच्या हस्ते कबूतर सोडून व फुगे हवेत सोडून करण्यात आले. कार्यक्रमासाठी ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या श्रीम.सैय्यद फरहाना,शेख मतीन,शेख वसीम, आयेशा मॅडम व सर्व अकरावी बारावीचे विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मतीन शेख यांनी केले. आभार आयेशा मॅडम यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.