न्यू चांद सुलताना हायस्कूलचा निरोप समारंभ संपन्न
मुख्याध्यापक अतीक शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना विद्यार्थ्यांना येणाऱ्या जीवनात कठोर परिश्रम घेण्यास प्रोत्साहन दिले आणि त्याच बरोबर सर्वांशी दयाळूपणे, सभ्यतेने आदराने वागावे असे सांगुन पुढील जीवनात पण शिक्षणाच्या बाबतीत काही मदद मार्गदर्शन हवे असल्यास अवश्य आमच्याशी संपर्क साधावा असे विधार्थांना सांगितले.
आबीद दुलेखान यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत प्रोत्साहन देऊन अभ्यासाकडे विशेष लक्ष देऊन अभ्यास करण्यासाठी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन शेख जाकेरा व फौजिया टकारी यांनी केले. तर आभार पिंजारी शब्बीर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख शबाना, मलिक रुबीना, शेख तब्बसुम, शेख तौसिफ, पटेल अतीक, मुख्याध्यापक शिक्षक व कर्मचारी वर्गाने भरपूर परिश्रम घेतले .
Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.