न्यू आर्ट्स मध्ये महाराष्ट्राची शाहिरी ललकार
मराठी विभागाच्या वतीने ‘वाचन वाढवा व्हिडिओ बनवा, रांगोळी, पोस्टर्स, स्टॅड अप कॉमेडी, मराठी गीतांवरील नृत्य व पारंपरिक वेशभूषा’ अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धाना विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. यातील विजेत्या स्पर्धकांचा गौरव प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एच. झावरे हे होते. त्यांनी आपल्या मनोगतातून दैनंदिन व्यवहारात आपण इतर भाषेतील अनेक शब्द वापरतो त्या ऐवजी मराठीतील जास्तीत जास्त शब्दांचा वापर आपण केला पाहिजे असे मत मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. लक्ष्मीकांत येळवंडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. महेबुब सय्यद यांनी करुन दिला. पारितोषिकांचे वाचन डॉ. वैशाली भालसिंग व डॉ. मच्छिंद्र मालुंजकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नवनाथ येठेकर यांनी केले तर आभार प्रा. निलेश लंगोटे यांनी मानले. या प्रसंगी कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. संजय कळमकर व विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. दिलीप ठुबे तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.