Maharashtra State Politics : भाजपाचे जागावाटपाचे सूत्रमित्रपक्षांना मान्य होईल का?
भारतीय जनता पार्टीची दुसरी यादी आठ मार्च रोजी होणार प्रसिद्ध? राज्यात अति महत्वाचं निर्णय घेणार असल्याची माहिती. २०२४ च्या लोकसभे निवडणुकीसाठी उत्तर प्रदेश राज्यामध्ये मित्र पक्षांसाठी सहा जागा सोडण्याची शक्यता असताना बीजेपी महाराष्ट्र राज्यात ३० जागेंसाठी निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. त्यांची दुसरी यादी देखील ८ मार्च रोजी जाहीर होणार असल्याची शक्यता आहे, ज्यात महाराष्ट्र राज्यातील जागांचा समावेश असणार असल्याची शक्यता असू शकते.
लोकसभा निवडणूक २०२४ संदर्भात भारतीय जनता पार्टीने एकूण ३७० जागे वर जिंकण्याचे लक्ष्य ठेवले असल्याची माहिती आहे. हे टार्गेट गाठण्यासाठी बीजेपी ला महाराष्ट्र राज्यात जास्त जागांवर विजय मिळावे लागतील. उत्तर प्रदेश राज्यानंतर महाराष्ट्र राज्यात हे अधिक जागा असलेले मोठे राज्य आहे. या वेळी महाराष्ट्रात बीजेपी ३० जागेंवर निवडणूक लढविणार असल्याचे शक्यता आहे. या परिस्थितीत शिवसेना पक्षासाठी- शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी -अजित पवार या दोन्ही पक्षासाठी १८ जागाच मिळतील. या पैकी १० जागा ह्या शिवसेना पक्षासाठी आणि ८ जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळू शकते. याचा अर्थ महायुती मध्ये बीजेपीच्या मित्र पक्षांकडून अधिक जागा मिळविण्यासाठी मागणी केली गेलीआहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ११ पॆक्षा अधिक जागा आणि अजित पवार यांनी ९ ते १० जागांची मागणी केली आहे. पण यावर भाजपला राज्यात यावेळी ३० जागांवर लढावयाचे आहेत. बीजेपीने शनिवारी दि.२ रोजी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. ज्यात महाराष्ट्र राज्यातील जागेचा समावेश नव्हता. आता पक्षाची दुसरी लिस्ट ८ मार्च रोजी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहेत. बीजेपीच्या केंद्रीय निवडणूक समिती पुढील बैठक हि ६ मार्च रोजी होणार आहेत.
दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे बीजेपीने आतापर्यंत शिंदे गटाच्या शिवसेनेसाठी ७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी ४ जागा सोडण्याची ऑफर दिल्याची माहिती समजते. जाहीर झालेल्या पहिल्या यादीत एकूण १९५ उमेदवारांमध्ये राज्यातील एकही उमेदवार नसल्याने चर्चेला उधाण सुरु झाले आहेत की बीजेपी महाराष्ट्र्र राज्यामध्ये सर्वाधिक जागेसाठी निवडणूक लढवू शकते. महाराष्ट्र राज्यात पक्षाने आजपर्यंत इतक्या जागांवरती उमेदवार उभेच नव्हते. मागील २०१९ च्या निवडणुकीतहि बीजेपीने २६ जागेंवर आपले उमेदवार उभे केले होते. परंतु त्यापैकी २३ जागाच जिंकता आल्या होत्या. यावेळी महाराष्ट्रात महायुतीसोबत बीजेपीने ४५ जागा जिंकण्याचे टार्गेट ठेवले आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेबरोबर त्यांनी ४१ जागेवरच विजय मिळविला होता.
निवडणूक २००९ साली बीजेपी-शिवसेनेने ४७ जागांसाठी उमदेवार उभे केले होते. त्यापैकी २० जागाच जिंकल्या होत्या. तेव्हा बीजेपीने २५ आणि शिवसेने पक्षाने २२ जागे वर उमेदवार उभे केले होते. बीजेपी आणि शिवसेना पक्षांना अनुक्रमे ९ व ११ जागा मिळाल्या होत्या. २००४ या वर्षी बीजेपीला २६ जागां पैकी १३ जागेवर विजय मिळवीला, तर शिवसेना पक्षाला २२ जागां पैकी १२ जागेंवर विजय मिळविला होता. १९९९ या वर्षी दोन्ही पक्षांना मिळून २८ जागेंवर विजय मिळावीला होता. त्यात बीजेपीच्या १३ आणि शिवसेना पक्षाच्या १५ जागा होत्या.
Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.