नाशिकमध्ये महायुतीला बंडखोरीचे होण्याची चिन्हं, भुजबळांना तिकीट दिल्यास गोडसे अपक्ष राहणार?

नाशिकमध्ये महायुतीला बंडखोरीचे होण्याची चिन्हं, भुजबळांना तिकीट दिल्यास गोडसे अपक्ष राहणार?

Bhujbal vs Godse, Loksabha Election 2024, chagan Bhujbal, Hemant Godse, Election, BJP, Congress, NCP



भुजबळांचे नाशिकच्या जागेवरुन महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु झालेली आहे. नाशिक जिल्ह्यामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते छगन भुजबळांना उमेदवारीची शक्यता बळावल्याने शिवसेनेचे असलेले विद्यमान खा. हेमंत गोडसे बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. त्यांना तिकीट न मिळाल्यास हेमंत गोडसे महायुतीमधून बाहेर पडून अपक्ष लोकसभा निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तवीली जात आहेत. त्यामुळे खा. गोडसे विरुद्ध महायुतीचे जेष्ठ छगन भुजबळ विरुद्ध महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे अशी तिरंगी लढत होणार असल्याची शक्यता आहेत. गोडसे व भुजबळ कुटुंबातही चौथ्यांदा सामना होण्याची  शक्यता आहे. 


निवडणुकीसाठी जागावाटपाच्या नियोजनामुळे हेमंत गोडसे व शिवसेनेचे काही पदाधिकारी मुंबईत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहे. याअगोदर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीत काही जागांमुळे मतभेद असल्याचे सांगितलेले होतेच.  त्यामुळेच बहुचर्चित नाशिकच्या जागे संदर्भातही होताच. अगदी भाजप व मनसेची नावे नाशिक मतदार संघासाठी लोकांमध्ये चर्चेत होती.


काही दिवस महायुतीतर्फे नाशिकच्या राष्ट्रवादीच्या जागा मिळणार असल्याची लोकांत चर्चा रंगली आहे. या जागेवर ज्येष्ठ छगन भुजबळांना उमेदवारी देणार असल्याचे म्हटले जात आहे. ओबीसीचा चेहरा म्हणून भाजपचाच भुजबळांना रिंगणात उतरविण्याचा मास्टर प्लॅन असल्याचे बोलले जात आहेत. तर नाशिक जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार असल्यामुले ही जागा शिवसेना पक्षालाच मिळावी अशी मागणी शिवसेनेकडून केली जात आहे.


त्याचप्रमाणे, छगन भुजबळ यांना नाशिक जिल्ह्यामधून उमेदवारी जाहीर झाली तर हेमंत गोडसे हे अपक्ष उमेदवारी  अर्ज समोर करतील व निवडणूक लढण्यावर ठाम आहे. परंतु हेमंत गोडसे यांनी उमेदवारी दिल्यास मतविभाजनाचा फटका महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे.

हेमंत गोडसेंनी श्रीकांत शिंदे यांनी परस्पर तिकीट जाहीर केल्यामुळे महा आघाडीत तणातणी झालेली  असल्याचे चित्र दिसून येत आहेत. अद्यापही अधिकृत उमेदवारी हि जाहीर झालेली नाहीत, तरी नुकतंच हेमंत गोडसेंनी प्रचाराचा प्रारंभ केलेला आहे.



गोडसे हे दोनदा लोकसभेवर निवडून आलेले आहेत. २०१४ व २०१९ सालीच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळविला होता. २००९ साली हेमंत गोडसे यांचा समीर भुजबळांनी बावीस हजारांनी पाडलेले होते. मात्र लोकसभा निवडणुकी २०१४ मध्ये हेमंत गोडसे यांनी समीर भुजबळ यांचा दोन लाख ९२ हजारच्या तफावतीने पाडलेले होते. त्यामुळे पुन्हा छगन भुजबळांच्या विरुद्ध गोडसे अशी रंगत लढणार का? हे प्रश्न लॊकांसमोर उपस्थित झालं असल्याचे हे बघणे महत्त्वाचे ठरेल. शिवसेने पक्षाकडून (उद्धव ठाकरे गट) आ. राजाभाऊ वाजेंना निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये कोण विजय निश्चित करणार हे लवकरच लोकांना स्पष्ट होणार. 



हेमंत गोडसेंच्या अपक्ष उमेदवार म्हणून  निवडणूक लढविण्याच्या निर्णयाने नाशिकची समीकरणे बदलणार की,  विजय शिवतारेंप्रमाणे बंडाळीची भूमिका घेणाऱ्या गोडसेंची मनधरणी करण्यात यशस्वी होणार आहे का? हे बघणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तडजोड करुन निवडणुकीसाठी जागेवरील हक्क सोडणार का?  की आपला दावा हा कायम ठेवणार हे येत्या काही दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईलच.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.