रोटरी क्लब अहमदनगर च्यावतीने सत्कार डॉ.सुधा कांकरिया यांना नोबल पुरस्कारासाठी नामांकन ही सर्वांसाठी अभिमानास्पद - स्वाती हेरकल
अहमदनगर - ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’ चळवळीच्या माध्यमातून डॉ.सौ.सुधा कांकरिया जनसामान्यापर्यंत आपल्या कार्याने पोहचल्या आहेत. मुलींच्या जन्मदर घटत असतांना, त्यांच्या चळवळीने समाजात जागृती होऊन स्त्री भ्रुण हत्या रोखण्यासाठी मोठी मदत झाली. त्याचबरोबर बाल कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करुन देत कांकरिया करंडकाने राज्यभरातून अनेक बाल कलाकारांना संधी दिली.
अहमदनगर - डॉ.सुधा कांकरिया यांचे नोबल पारितोषिकासाठी नामांकन मिळाल्याबद्दल त्यांचा रोटरी क्लब अहमदनगर च्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी डिस्टिक गव्हर्नर स्वाती हेरकल, अध्यक्ष माधव देशमुख, दीपक गुजराती, साधना देशमुख, हर्षवर्धन सोनवणे, प्रीती सोनवणे, नेहा जाधव, डॉ. प्रकाश कांकरिया, प्रशांत बोगवत, नितीन खाडे, कौशिक कोठारी आदि.तसेच राजयोगा जीवन पद्धतीद्वारे शांतीचा प्रचार आणि प्रसार करत कैदी बांधवांना केलेल्या मार्गदर्शनामुळे त्यांच्यातही परिवर्तन होत आहे. त्यांनी समाजातील स्त्री-पुरुष, लहान थोर अशा सर्वांसाठी करत असलेले कार्य हे खरोखर कौतुकास्पद आहे. त्यांच्या गेल्या अनेक वर्षांच्या कार्याची दखल घेत त्यांना नुकतीच नोबल पुरस्कारासाठी नामांकन मिळाले, ही सर्वांसाठी अभिमानास्पद अशीच बाब आहे, असे प्रतिपादन रोटरी क्लबच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर स्वाती हेरकल यांनी केले.
याप्रसंगी अध्यक्ष माधव देशमुख म्हणाले, डॉ.सुधा कांकरिया यांचे सामाजिक, अध्यात्मिक, आरोग्य क्षेत्रातील कार्य सर्वांनाच परिचित आहे. समाजातील प्रत्येक घटकांसाठी त्या कार्यरत राहून त्यांच्या जीवनात शांती व समाधान आणण्याचे काम करत आहेत. रोटरी क्लबच्या विविध उपक्रमातही त्यांचे योगदान असते. अशा बहुआयामी व्यक्तीमत्वाला मिळालेले नोबल पुरस्कारासाठी नामांकन ही त्यांच्या कार्याची पावतीच म्हणावी लागेल, असे गौरवोद्गार काढले.
यावेळी दीपक गुजराती यांनी प्रास्तविकात डॉ.सुधा कांकरिया यांच्या कार्याचा गौरव केला. साधना देशमुख यांनी आभार मानले.
Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.