Sangamner : शहाराची शांतता बिघडविणाऱ्यांचा उद्देश सफल होवू देऊ नका : माजी महसूलमंत्री थोरात
आमदार थोरात म्हणाले, महाराष्ट्र राज्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या Sangamner शहराच्या सांस्कृतिक सौहार्दाच्या वातावरणाला काळीमा फासण्याचे काम काही विघ्नसंतोषी प्रवृत्ती करीत आहेत. शहरात दंगली घडवून शांतता, सुव्यवस्था, बंधुभाव आणि धार्मिक सलोखा नष्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे दिसते आहेत. अशावेळी बंधुभाव, शांतता टिकवणे आणि आपले Sangamner शहर व तालुक्याचा सुसंस्कृतपणाचा लौकिक टिकवणे ही निश्चितच आपल्या सर्वांची अत्यंत महत्वाची जबाबदारी असून, ती जबाबदारी आपण सर्वांनी पार पाडलीच पाहिजे. संगमनेर शहराचे वातावरण दुषित करनाऱ्या गुन्हेगारांना कडक शासन व्हायलाच हवे, सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या अफवा किंवा प्रक्षोभक भाषणे करुन, दंगलीला कारणीभर्धीं ठरणाऱ्या प्रवृत्तींवर प्रशासनाने कडवी नजर ठेवण्याच्या सूचना बा साहेब थोरात यांनी केल्या.
अशा अपप्रवृत्तींचा वेळीच समाचार घेवून, त्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची तसेच त्यांना कठोर शासन करण्याची मागणीही थोरात यांनी केली आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये प्रशासनाविषयी विश्वासाची भावना निर्माण होईल. तसेच निरपराध नागरिकांना याचा त्रास होणार नाही या निरपेक्ष भावनेने प्रशासनाने काम करावे अशी अपेक्षाही आमदार बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केली आहे.
तसेच आपणा सर्वांसह Sangamner शहर व तालुक्यातील जनतेने आपल्या संगमनेर शहराचा व तालुक्याचा लौकिक वाढवणारा बंधुभाव, शांतता आणि सुव्यवस्था वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणाऱ्यांच्या मागे भक्कमपणे उभे राहून त्यांना साथ देण्याची आवश्यकता आहे. या पुढील काळात आपण सर्वांनी मिळून आपल्या Sangamner शहराचा ‘आनंदी शहर' म्हणून लौकिक निर्माण करण्यासाठी सर्वांनी काम करण्याचे आवाहन कसा आमदार बाळासाहेब थोरात यांनी Sangamner शहर व तालुक्यातील जनतेला केले आहे.
Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.