होळीच्या दिवशी विराट कोहलीचा धमाका, आयपीएलचा सर्वात मोठा विक्रम, सुरेश रैना आणि रोहित शर्माचा विक्रम मोडला
पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने एक विक्रम केला. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यादरम्यान विराट कोहलीने एक विक्रम केला. इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये एक रोमांचक लढत पाहायला मिळाली. रंगांच्या होळीच्या दिवशी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्जचे संघ खेळायला आले होते. या सामन्यात सर्वांच्या नजरा स्टार खेळाडू विराट कोहली आणि शिखर धवनवर लागल्या होत्या. बंगळुरू टीमचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्या दरम्यान विराट कोहली याने एक विक्रम करत आतापर्यंत भारतीय उत्कृष्ट खेळाडू सुरेश रैना याच्या नावावर होता.
आयपीएलचा सामना हा सोमवारी 25 मार्च रोजी खेळला गेला त्याच दिवशी संपूर्ण भारतामधे होळी साजरी करण्यात आली व रंगांच्या या सणानिमित्त आपल्या चाहत्यांना त्यांच्या लोकप्रिय खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळताना पाहण्याची मोठी संधी मिळाली होती. नाणेफेक गमाविल्यानंतर पंजाबकिंग्ज टीम पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी आले. टीम चा कर्णधार शिखर धवन याने सर्वाधिक 45 रन केले व पूर्ण संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू समोर 6 गडी गमावून केवल 176 रन केले. शेवटी शशांक सिंग याने 8 चेंडूमधे 21 रनांची खेळी करत टीमला या धावसंख्ये पर्यंत पोहचविले.
विराट कोहलीचा विक्रम -
भारतातील महत्वाचा मानला जाणारा सन होळीच्या दिवशी पंजाब किंग्ज टीम विरुद्ध खेळायला आलेल्या विराट कोहली याने हा सामना संस्मरणीय बनवली आहे. टीमचा सलामीवीर जॉनी बेअरस्टो याचा झेल घेत विराटने रेकॉर्ड बुक मध्ये आपले नाव नोंदवले आहे. विराट कोहली भारताकडून टी-20 सामन्यामध्ये सर्वाधिक झेल घेणारा भारतीय ठरला आहे. या आधी सुरेश रैनाचे नाव या यादीत समाविष्ट होउन ते अग्रस्थानी होते. या मधे रोहित शर्मा तिसऱ्या तर मनीष पांडे चौथ्या क्रमांकावर आहे.
सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम -
भारताकडून टी-20 मध्ये 174 झेल घेण्याचा विक्रम हा विराट कोहली यांच्या नावावर आहे. या फॉरमॅट मध्ये सुरेश रैना याने भारताकडून 172 झेल घेतलेले होते. रोहित शर्मा याच्या नावावर 167 झेलचा विक्रम आहेत. मनीष पांडे याने टी-20 मध्ये आता पर्यंत एकूण 146 झेल घेतलेले आहेत. मुंबई इंडियन्स टीमच्या सूर्यकुमार यादव याने आतापर्यंत 136 झेल घेतलेले आहेत.
Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.