Fruit Crop Insurance : शेतकर्यांना 8 फळपिकांवर मिळणार विमा संरक्षण, असा मिळणार शेतकऱ्यांना मोठा फायदा..

Fruit Crop Insurance :  शेतकर्यांना 8 फळपिकांवर मिळणार विमा संरक्षण, असा मिळणार शेतकऱ्यांना मोठा फायदा.. 

Fruit Crop Insurance


महाराष्ट्र राज्यामधील 26 जिल्ह्यांत  मृग नक्षत्रामधे शेतातील पिकांना येणारा बहार हा मृग बहारातील आठ शेत फळपिकांसाठी हवामानवर आधारित फळपीकांची योजना राबविण्यात येत असल्याचे माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहेत. 


महाराष्ट्र राज्याने आठ फळ पिकांसाठी हवामान आधारित फळ पीकांवर योजना राबविण्याचे ठरवलेले आहेत. याप्रमाणे महराष्ट्र राज्यामधील 26 जिल्ह्यांमध्ये मृग बहारातील आठ फळपिकांसाठी हवामान आधारित शेतकी फळपीकांची योजना राबविण्यात येत असल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने  देण्यात आलेली आहे. चिकू, पेरू, लिंबू, द्राक्ष, संत्रा, मोसंबी, डाळिंब व सीताफळ या आठ पिकांचाही त्यात समावेश करणार आहेत. ही योजना हवामान धोक्याच्या निकषानुसार व उत्पादनक्षम फळ बागांसाठी लागू राहणार असल्याची माहिती कृषी आयुक्तालयातील विनयकुमार आवटे यांनी दिली.


मान्सूनमुळे कमी पाऊस किंवा जास्त पाऊस पडते, पावसामुळे खंड पडतो, त्यामुळे सापेक्ष आर्द्रता, किमान किंवा कमी तापमान या हवामानाच्या बदलामुळे धोक्यांपासून या योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण दिले जाणार आहेत. ही लाभदायी योजना फळ पिकांसाठी ऐच्छिक आहे. योजनेत सहभागी होण्याबाबत अथवा न होण्याबाबत घोषणापत्र हे ज्या बँकेमध्ये पीककर्ज खाते, किसान क्रेडिट कार्ड खाते आहे, तिथे जमा करणे आवश्यक आहे. पुणे जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड शासनाने निश्चित केली आहे. या योजनेमध्ये नमूद केलेल्या फळ पिकांसाठी कुळाने व भाडेपट्टी या द्वारे शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना भाग घेता येऊ शकतात.


शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना विमा हप्ता हा एकूण तीन हजार उचलावे लागते. विमा हप्ताचा दर हा सहा हजारांचा प्रति हेक्टरसाथी असेल, पिकाच्या किंवा फळबागासाठी विमा संरक्षित हप्ता हा रकमेच्या 5 टक्क्यांच्या मर्यादित असतो. मात्र एकूण वास्तव दर्शी विमा हप्ता 35 टक्क्यांहून अधिक असल्यास त्या अधिक विमा हप्त्यातील 50 टक्के भार शेतकऱ्यांना उचलावा लागतो. विमा हप्ता दर जिल्हानिहाय वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे शेती करणारे शेतकऱ्यांनी भरावयाच्या विमा हप्त्यात जिल्हानिहाय कमी जास्त रकमेचा फरक हा असू शकतो.


या योजनेमध्ये अधिसूचित क्षेत्रामध्ये आणि अधिसूचित फळपिकांसाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांबरोबरच इतर सर्व शेतकरी हिस्सा घेवू शकतात. पीकासाठी कर्ज घेणारे आणि बिगर कर्जदार शेतकरी यांच्यासाठी योजनेत सहभाग घ्यावयाचे हा त्यांचा ऐच्छिक प्रश्न राहणार आहेत.


लागणारे कागदपत्रे -

बिगर कर्जदार शेती करणारे शेतकरी ठरलेल्या फॉर्म हा वेळेत बँकेत किंवा वेबसाइटवरती ऑनलाईन फळपीक विमापोर्टल या पुढील वेबसाइट वरती www.pmfby.gov.in पीक व फळ विमा हप्ता हा  जमा करून भाग घेता येऊ शकतात. त्यासाठी शेतकऱ्यांचा आधार कार्ड, जमीनीचा 7/12 व 8 अ चा  उतारा आणि पीक लागवड स्वयंघोषणापत्र त्याच फळबागेचा जिओ टॅगिंग केलेला लाईव्ह इमेज आपलोड करावे लागेल. त्याचबरोबर बँकेचा पासबुक वरील बँक खातेची सविस्तर माहिती ही पहिले पान द्यावे लागेल. हा विमा फॉर्म कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा इतर शासकीय सेतुमध्ये ऑनलाइन भरता येऊ शकते. 


अधिसूचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा अंबिया बहर पैकी, कोणत्याही एकाच हंगामासाठी विमा संरक्षण अर्ज करता येईल.  एक शेती करणारा शेतकरी चार हेक्टरच्या मर्यादित पीक विमा संरक्षण घेवू शकतात.  

ऑनलाइन विमा हप्ता -

शेतकऱ्यांनी वेबसाइट वरती ऑनलाइन विमा हप्ता भरण्यासाठी www.pmfby.gov.in या पोर्टला भेट द्यावीशेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेत स्थळावरती  www.maharashtra.gov.in भेट द्यावे. दि. 18 जून 2021 रोजीचे संबंधित शासन निर्णयावर ही नजर मारावी. संबंधित विमा कंपनी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

मान्सून -

मान्सून सुरू असला तरी जून 15 ते जुलै 14 या कालावधीमध्ये कमी पाऊस पडतो.  या कालावधीमध्ये 76 मिलि ते 100 मिली पावसाचे प्रमाण  झाल्यास बारा हजार रुपये तसेच 76 मिमी पेक्षा कमी पाऊस झाल्यास 30 हजार रुपये विमा संरक्षण असणार आहे.

 विमा संरक्षण -

वर्षाच्या 15 जुलै पासून ते15 ऑगस्ट पर्यंत या कालावधीमधे सलग पंधरा ते एकवीस दिवसांत पावसात खंड आणि तापमान हा 32 अंश सेल्सिअस व त्याहून पेक्षा अधिक सलग तीन दिवस राहिल्यास फार हजार रुपयांचा विमा संरक्षण मिळणार आहे. या कालावधीमध्ये 21 दिवसांत जास्त पावसात खंड व तापमान 32 अंश सेल्सिअस राहील 30 हजारांपर्यंत विमा संरक्षण मिळू शकतो.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.