शिल्पकार बालाजी वल्लाल महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित
0LOKHEETMay 22, 2024
शिल्पकार बालाजी वल्लाल महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित
अहमदनगर- बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड लंडन पुरस्कृत संघटना महाराष्ट्र पुरस्कार सोहळा समितीतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तृत्वान व्यक्तींचा महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात येते. यावर्षी हा पुरस्कार अहमदनगर येथील इतिहास प्रेमी शिल्पकार बालाजी भैरवनाथ वल्लाल यांना महाराष्ट्र रत्न पुरस्काराने पुणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. यावेळी पोलीस मित्र संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलास दादा पठारे, भुमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्ती देसाई, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. बालाजी वल्लाल यांनी पुरस्कार दिल्याबद्दल संस्थेचे आभार मानले. बालाजी यांना यापूर्वीही त्यांच्या कार्याबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहे. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अहमदनगर येथील इतिहास प्रेमी मंडळ, मख़दुम सोसायटी तर्फे व त्यांच्या अनेक मित्र परिवाराने बालाजी वल्लाल यांचे अभिनंदन केले आहे.
Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.