मदर तेरेसा उर्दु ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींचे यश
अहमदनगर - मोहंमदिया एज्युकेशन सोसायटी संचलीत मदर तेरेसा उर्दु ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स् अॅण्ड कॉमर्स फॉर गर्ल्स, मुकुंदनगर, अहमदनगर (कॉलेज कोड क्रमांक.जे.१२.०५.०४०) च्या मार्च २०२४ मध्ये झालेल्या एच.एस.सी. परीक्षेचा निकाल ९२.६८% लागला असुन प्रथम क्रमांक कुमारी खान शबाना अकरम-४६१ गुण, व्दितीय क्रमांक कुमारी खान इकरा इसरार-४५९ गुण व तृतीय क्रमांक कुमारी सय्यद आयशा कय्युम-४४९ गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झाले. विशेष योग्यतेने ०२ विद्यार्थिनी, प्रथम श्रेणीत २० विद्यार्थिनी, व्दितीय श्रेणीत १३ व पास श्रेणीत ३ विद्यार्थिनी असे एकुण ३८ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत.
कॉलेजच्या प्राचार्या सय्यद फरहाना नाज मुजफ्फर हुसैन, प्राध्यापक शिक्षिका शेख रुबीना गुलाम दस्तगीर, प्राध्यापक शेख मतीन सलीम, प्राध्यापक शेख वसीम गुलाम दस्तगीर तसेच संस्थेचे सचिव व प्रमुख कार्यवाह डॉ.प्रा.शेख अब्दुस सलाम अब्दुल अजीज सर व इतर पदाधिकाऱ्यांनी विधार्थिंनींचे अभिनंदन केले आहे.
Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.