डॉ. कमर सुरुर यांचा प्रसार भारतीच्या डीडी उर्दू वर शायरीचे प्रसारण
अहमदनगर : अहमदनगर येथील जगविख्यात कवयित्री डॉ.कमर सुरूर यांना प्रसार भारतीच्या डीडी उर्दूच्या" कवी हाजीर है" या कार्यक्रमात निमंत्रित करण्यात आले होते. दोन भाग त्यांच्या शेर शायरीचे रेकॉर्ड करण्यात आले.
त्यातील पहिल्या भागाचे प्रसारण प्रसार भारतीच्या डीडी उर्दू वर शनिवार दिनांक 25 मे 2024 रोजी रात्री आठ वाजता प्रसारित होणार असून दुबार प्रसारण रविवार दिनांक 26 मे 2024 रोजी रात्री आठ वाजता प्रसारित होणार आहे.
तरी या शेर शायरीचा आनंद गझल रसिकांनी अवश्य घ्यावे असे आवाहन अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे सचिव आबीद दुलेखान यांनी केले आहे.
Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.