जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने गरजू थॅलेसेमिया व सर्वच रुग्ण आणि शासकीय यंत्रणा यांच्यातील सेतू व्हावे. : सुधाकरजी यार्लगड्डा (Shri. Sudhakar V. Yarlagadda)

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने गरजू थॅलेसेमिया व सर्वच रुग्ण आणि शासकीय यंत्रणा यांच्यातील सेतू व्हावे. : सुधाकरजी यार्लगड्डा (Shri. Sudhakar V. Yarlagadda)


अहमदनगर -  जगात अशा काही जागा आहेत की जिथे नरक यातना आहेत नरकासारखे आयुष्य लोक जगतात आणि असेही काही लोक आहेत जे आहे त्याठिकाणी स्वर्ग बनविण्याचा प्रयत्न करतात, जसे सरकारी दवाखाना स्वर्ग आहे. असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगरचे सुधाकरजी यार्लगडडा (Shri. Sudhakar V. Yarlagaddaबोलत होते. 

Shri. Sudhakar V. Yarlagadda


जागतिक थैलेसिमिया दिनाचे औचित्य साधून ८ मे २०२४ रोजी जिल्हा रुग्णालय येथे ऋतुजा फाऊंडेशन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर, जिल्हा रूग्णालय अहमदनगर, शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशन आयोजित थॅलेसेमिया रूग्णांसाठी आणि जनजागृती साठी विविध तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. 
सदर शिबीगमध्ये थॅलेसेमिया रूग्णांची वार्षिक तपासणी, एच.एल.ए. टायपिंग, बोन मॅगे रजिस्ट्रेशन, रक्तदान, अवयव दान, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी तसेच थेलेसिमिया रुग्णांच्या नातेवाईकांची थेलेसिमिया मायनरची (इलेक्ट्रोफोरोसिस) तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले.  
एकूण २०० रूग्णांची इतर व मायनरची तपासणी ह्या शिबीरात करण्यात आली. प्रास्ताविकात अॅड. डॉ. अंजली केवळ यांनी विविध शिबीरांची माहिती दिली. तसेच रूग्णांना जिल्हा रूग्णालयातून होत असलेल्या लोह कमी करण्याच्या गोळ्या बदलून मिळण्याविषयी तसेच इतर अडचणी जिल्हा रूग्णालयाने दूर कराव्यात अशी विनंती केली. 



जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने गरजू थॅलेसिमिया व सर्वच रूग्ण आणि शासकीय यंत्रणा यांच्यातील सेतू व्हावे. आयुष्याचे चार टप्पे त्यांनी सोप्या भाषेत सांगितले आणि प्रत्येकाने आयुष्यात दोन दिवे लावावेत. एक दिवा आई वडील मुलांच्या प्रति असलेले कर्तव्य, दुसरा दिवा समाजकार्यासाठी हे आपले दुसरे उत्तरदायित्व, कारण आपणही समाजाचे काही देणे लागतो असे सांगितले.

Shri. Sudhakar V. Yarlagadda



कारण तिथे सेवा भाव आहे, प्रत्येकाला बरे करण्याची इच्छा आहे आणि हेच काम ऋतुजा फाऊंडेशन करत आहे. जे जे पेशंट ह्या आजारांनी ग्रस्त आहेत त्यांना धीर देण्याचे तसेच योग्य मार्गदर्शन देण्याचे काम ऋतुजा फाऊंडेशन करते. 


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगरचे सुधाकरजी यार्लगडडा (Shri. Sudhakar V. Yarlagadda होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती भाग्यश्री का. पाटील (सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर) तसेच डाॅ.संजय घोगरे (जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रूग्णालय, अहमदनगर) , श्रीमती वैशाली कोरडे(प्राचार्या नर्सिंग काॅलेज अहमदनगर), श्रीमती ज्योती लोंढे(अधिसेविका, नर्सिंग काॅलेज अहमदनगर), श्री. महेश केवळ (संस्थापक, ऋतुजा फाऊंडेशन) कु. ऋतुजा केवळ (उपाध्यक्षा, ऋतुजा फाऊंडेशन), डॉ. रूपाली कुलकणीं (वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रूग्णालय), डॉ. आशिष इरमल (जिल्हा समन्वयक, जिल्हा रूग्णालय) डॉ अमृता गवळी (भौतिकोपचार तज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय), अविनाश कराळे (समुपदेशक, जिल्हा रूग्णालय) उपस्थित होते. 


जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे पॅनल विधिज्ञ ॲड.सुरेश लगड, ॲड.विक्रम वाडेकर,ॲड. राजाभाऊ शिके, ॲड.अनुराधा येवले,ॲड.वैभव बागुल,ॲड. रूपाली पठारे,ॲड.रत्ना दळवी,ॲड. मच्छिंद्र देठे हे शिबीरास उपस्थित होते. शिबीराच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर, जिल्हा रुग्णालय अहमदनगर, शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फाऊंडेशन अहमदनगर, कोकिळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मुंबई, समीर बेग, दिपक चौरे, महेश जोगदंड, स्वप्नील शिगटे, ऋषीकेश केवळ आदिंनी परिश्रम घेतले.


प्रास्ताविक संस्थापक सचिव डॉ. अॅड. अंजली केवळ यांनी तर सूत्रसंचालन ऋतुजा फाऊंडेशनच्या सदस्या सौ. दिपाली चुत्तर यांनी केले. आभार डॉ. रूपाली कुलकर्णी यांनी मांनले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.