भारतीय योग संस्थान अहमदनगर शाखेकडुन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
अहमदनगर - भारतीय योग संस्थान (पंजीकृत) च्या अहमदनगर शाखेकडुन आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अनेक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येवुन जगण्यातील योगाचे महत्त्व पटवुन देण्यात आले. अहमदनगर शाखेच्या जिल्हा प्रमुख सौ. विद्या मुळे यांच्या नेतृत्त्वाखाली मिलिटरी हॉस्पिटल अहमदनगर, रुपीबाई बोरा हायस्कुल, नय्यर स्कुल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदा, बी.एस.एन.एल. अहमदनगर आणि गार्गी हास्य क्लब या ठिकाणी योग प्रात्यक्षिके, प्राणायाम आणि ध्यान याचे धडे देण्यात आले.
मिलीटरी हॉस्पिटल चे ब्रिगेडिअर डॉ. वाणी सुर्यम यांच्याहस्ते भारतीय योग संस्थान अहमदनगर शाखेला स्मृतीचिन्ह देवुन गौरवण्यात आले. कर्नल डॉ. रितिका कारखानीस, लेफ्टनंट कर्नल डॉ. नितुल बेवाल यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
हा उपक्रम राबविण्यासाठी अहमदनगर शाखेच्या मनिषा कुलकर्णी, सुनिता धानापुणे, बाळासाहेब गव्हाणे, कविता खिलारी, सुलभा जाधव, वंदना गोरे, मनिषा दराडे, सौ. खामकर, मंगल गोरे, सेना आंबेकर, अलका हारके, ज्योती दुस्सा, रोहिणी कानडे, भारद्वाज ओहोळ यांनी योगदान दिले.
Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.