शहिद अब्दुल हमिद यांच्या जयंतीनिमित्त मखदुम, रहमत सुलतान व मराठा सेवा संघातर्फे विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप
कर्तव्य समजून गरजूंना मदत करायला हवी- तन्वीर चष्मावाला
अहमदनगर - समाजामध्ये गरजूंना मदत करणार्यांची संख्या वाढली आहे. पण लोक मदत करणे म्हणजे उपकार समजून करायला लागले आहे. ही मानसिकता बदलून कोणतेही मदत कार्य हे कर्तव्य समजून करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अलनुर आँप्टिकलचे संचालक तन्वीर चष्मावाला यांनी केले.
मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी, रहेमत सुलतान फाऊंडेशन व मराठा सेवा संघाच्यावतीने शहिद अब्दुल हमिद यांच्या जयंतीनिमित्त गोविंदपुरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे मधील सर्व विद्यार्थ्यांना शफी हज टुर्स,डॉ रेश्मा चेडे,डॉ विवेकानंद कंगे, राजुभाई शेख, अजय अदमाने, शाहीद शाह, सुनील भंडारी, चारुताई शिवकुमार, अभय मुथा, बिंबसर डोंगरे, एड.अमीन धाराणी, निशांत दातीर, उज्वला कुलकर्णी, किरण उजागरे, सुनील वाघमारे, सुनील हळगावकर, डॉ परवेज अशरफी, महेश घावटे, आदी दानशूरांच्या सहकार्याने मोफत वह्यांचे वाटप तन्वीर चष्मावाला व डॉ कमर सुरुर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अलनुर आँप्टिकलचे संचालक तन्वीर चष्मावाला, अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव डॉ कमर सुरुर, मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान,पठाण सुमय्या मोहसीन आदि उपस्थित होते.
पुढे बोलतांना तन्वीर चष्मावाला म्हणाले की, समाजामध्ये स्वार्थीपणा फार वाढत चाललेला आहे. कोणतेही समाजा कार्य करतांना बहुतांश संघटनांचा त्यामागे काही ना काही हेतू असतो, असे समाजकार्य किंवा पुण्यकार्य परमेश्वरालाही नकोय. नि:स्वार्थीपणाने आज कार्य करण्याची खरी गरज असून, त्यासाठी बौद्धीक प्रबोधन होण्याचीही आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख अंजुम बाजी यांनी केले. प्रास्तविक शेख दिलशाद
यांनी केले तर आभार सय्यद फरीदाबानो यांनी मानले.
Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.