भारतीय संविधान कलम निबंध विषयास अॅड. गौरी लोखंडे यांचा तृतीय क्रमांक
नगर - अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने जिल्हा न्यायालयाच्या द्विशतक पूर्ती निमित्त आयोजित निबंध स्पर्धेत नगर येथील अँडव्होकेट गौरी विठ्ठल लोखंडे यांच्या भारतीय संविधान कलम 51. अ प्रमाणे असलेल्या नागरिकांचे मूलभूत कर्तव्य, आजची परिस्थिती व उपाय या विषयावरील निबंधास तृतीय क्रमांक मिळाला आहे. नगर येथे जिल्हा न्यायालयाच्या वतीने आयोजित निबंध स्पर्धेत 40 स्पर्धकांनी भाग घेतला होता यामधून अँड. गौरी लोखंडे यांना तृतीय क्रमांकासाठी 3000 रुपये रोख प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती व जिल्ह्याच्या पालक न्यायाधीश विभा कंकणवाडी यांच्या हस्ते पारितोषिक देऊन ॲड. गौरी लोखंडे यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी न्यायमूर्ती उर्मिला जोशी फलके, न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर, न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, माजी न्यायमूर्ती एस. के. शिंदे, सुधाकर देशमुख, बार असोसिएशन कौन्सिलचे अध्यक्ष अँड.राजेंद्र उमाप उपाध्यक्ष अँड .उदय वारुंजीकर, अँड. सतीश पाटील, ॲड. नरेश गुगळे, अँड. महेश शेडाळे, अँड .संदीप शेळके, तसेच बार असोसिएशनचे सभासद, वकीलवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. अँड.गौरी लोखंडे यांनी भारतीय संविधान 51.अ प्रमाणे असलेल्या परिस्थितीचे वस्तुस्थितीनिष्ठ लिखाण आपल्या निबंधातून करून सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत कर्तव्य कसे पार पाडावे हे आजच्या परिस्थितीवरील वर्णन नमून केले. या विषयावरील निबंधास तृतीय बक्षीस मिळाल्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. माजी मुख्याध्यापक विठ्ठल लोखंडे व माजी मुख्याध्यापिका कुसुम लोखंडे यांची ती कन्या आहे. प्रसिध्दी करीता - विजय मते. फोटो ओळी - नगर येथे जिल्हा न्यायालयाचे वतीने आयोजित निबंध स्पर्धेत अँड.गौरी लोखंडे यांना तृतीय क्रमांकाचे बक्षीस प्रदान करण्यात आले. याप्रसंगी न्यायाधीश विभा कंकणवाडी समवेत न्यायमूर्ती उर्मिला जोशी फलके, न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर, न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, न्यायमूर्ती एस. के. शिंदे , मान्यवर व्यक्ती उपस्थित होते ( छाया - विजय मते)
Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.