युनिर्व्हसल डेंटल क्लिनिकच्यावतीने चांद सुलताना हायस्कूलमधील 800 विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी
फास्टफूड,चॉकलेट सारख्या बाबींमुळे मुलांना दातांच्या समस्या - डॉ साॅलेहा बागवान
अहमदनगर - आज फास्टफूट, चॉकलेट, व्यायाम, मैदानी खेळांचा अभाव यामुळे लहान मुलांमध्ये आरोग्याच्या समस्या जाणवत आहे. याकडे पालकांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. शाळेतील शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत नेहमीच चांगल्या सूचना देत असतात. परंतु त्या अंमलात आणण्याचे काम पालकांनी केले पाहिजे. दातांची समस्या ही अनेक मुलांना जाणवत असते. त्याबाबत जागृत होणे गरजेचे आहे. आज चांद सुलताना हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची दंत तपासणी करुन मार्गदर्शन केले. यामुळे विद्यार्थी दातांची काळजी घेतील. युनिर्व्हसल ट्रस्टच्या माध्यमातून शालेय स्तरावर विविध जागृतीपर उपक्रम घेतले जातात, त्याचप्रमाणे गरजूंना मदतीचाही हात दिला जातो, असे प्रतिपादन डॉ. साॅलेहा बागवान यांनी केले.युनिर्व्हसल एज्युकेशन ट्रस्टच्या युनिर्व्हसल डेंटल मल्टीस्पेशालिटी क्लिनिक, अहमदनगर च्यावतीने चांद सुलताना हायस्कूल मधील 800 विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी करण्यात आली. याप्रसंगी ट्रस्टचे व्हाईस चेअरमन शेख महेबुब सर, चांद सुलताना हायस्कुल चे अध्यक्ष सय्यद मतीन, उपाध्यक्ष समद खान,असगर अली, सदस्य मन्सूर भाई, गुलाम दस्तगीर, जुबेर भाई, पप्पू भाई जहागीरदार, मौलाना शफी, राजमोहम्मद शेख, मुख्याध्यापक अतिक सर, पर्यवेक्षक जफर सर आदी मान्यवर उपस्थित होते. मुलांची तपासणी डॉ.सॉलेहा बागवान, डॉ. वैष्णवी गोरे ,डॉ सायली शिंदे,डॉ सावन पालवे, प्रेरना केरूळकर, दिपा शिंदे, मास्टर मुस्तफा,आशा आदिंनी केली.
याप्रसंगी मतीन सैय्यद म्हणाले, शैक्षणिक कार्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य विषय जागृती व्हावी, लहानपणापासून त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे, यासाठी शाळेच्यावतीने विविध उपक्रम राबवत असते. विद्यार्थीना सामाजिक जाणिवेतून स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, पर्यावरण रक्षण, याबरोबर कला-क्रिडा, स्पर्धा परिक्षांसाठी प्रोत्साहन दिले जाते. आज युनिर्व्हल ट्रस्टचे चांद सुलताना हायस्कुल मध्ये दंत तपासणीचा चांगला उपक्रम राबविला. याद्वारे विद्यार्थ्यांना दाताचे महत्व आणि त्याची काळजी कशी घ्यावी, या विषयीचे ज्ञान मिळाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगली जागृती झाल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक अतीक सर यांनी केले. तर आभार जफर सर यांनी मानले. यावेळी सुमारे 800 मुलांची दंत तपासणी करण्यात आली. या उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले.
Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.