वायफट खर्चाला टाळून भंडारा महाप्रसादाचे आयोजन

वायफट खर्चाला टाळून भंडारा महाप्रसादाचे आयोजन
नालसहाब सवारी ट्रस्टच्या अंतर्गत पिरशाहखुंट यंग पार्टीची यावर्षी मोहरम वर्गणी, डीजे चादर मिरवणूक करणार नाहीत


अहमदनगर- शहरातील गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक व धार्मिक कार्या मध्ये कार्यरत असलेली नालसहाब सवारी ट्रस्ट रजि. नं. ३०७. मोहरम सणानिमित्त निमित्त नालसाहब सवारी ट्रस्ट - ३०७ व पिरशाहाखुंट यंग पार्टीची कार्यकारणी जाहीर झाली पदाधिकारी खालीलप्रमाणे- अध्यक्षपदी सलीम जरीवाला, उपाध्यक्षपदी असलम बागवान, खजिनदारपदी हाजी मोहम्मद अली बागवान, सेक्रेटरी पदी जब्बार मोमीन यांची एकमताने निवड करण्यात आली.

तरी यावर्षी ट्रस्टच्या वतीने महत्त्वाची भूमिकेच्या मिटिंग मध्ये निर्णय घेण्यात आले की या वर्षापासून पिरशाहाखुंट यंग पार्टीची मोहरम वर्गणी व चादर मिरवणूक काढणार नाहीत आणि हीच भूमिका ट्रस्टच्या गेल्या अनेक वर्षापासून आहे. डी.जेच्या चादर मिरवणूकच्या वायपट खर्चाला टाळून त्याऐवजी यावर्षी नालसाहब सवारी ट्रस्ट व पिरशहाखुंट यंग पार्टीच्या वतीने भंडारा महाप्रसादाच्या आयोजन करण्यात आले आहेत. तरी अहमदनगर शहरातील सर्व नागरिकांना याद्वारे आव्हान करण्यात येत आहे की कोणीही नालसाहब सवारी ट्रस्ट व पिरशहाखुंट यंग पार्टीच्या नावाने वर्गणी किंवा चंदा मागायला आले तर त्यांना देऊ नये, कोणीही वर्गणी करिता बळजबरी करत असेल तर त्वरित संबंधित पोलीस स्टेशनला कळविण्यात यावे व कायदेशीर मार्गाने त्यांच्यावर कारवाई करावी.

पिरशहाखुंट चौक येथे प्रत्येकवेळी साजरा होणारे मोहरम सण, ईद मिलादुन्नबी, रमजान ईद, बकरईद व इतर सण व उत्सव नालसाहब सवारी ट्रस्टचे सवखर्चातून करण्यात येतात याचा ही सर्वांनी नोंद घ्यावी.
यावेळी मीटिंग मध्ये सलीम गुलाम मुस्तफा जरीवाला, हाजी मोहम्मद अली गुलाम रसूल बागवान, असलम महमूभाई बागवान, शेख जब्बार निजाम मोमीन, रियाज रहिमबक्ष तांबोळी, शेख फैयाज फकीर मोहंमद सहाब बावर्ची, शेख गफुर इस्माईल व सर्व सभासद व नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.