आपल्या आवाजाने लता मंगेशकर यांनी जगाच्या पाठीवर भारताचे नाव उमटविले- एड.अमीन धाराणी..

आपल्या आवाजाने लता मंगेशकर यांनी जगाच्या पाठीवर भारताचे नाव उमटविले- एड.अमीन धाराणी

गाता रहे मेरा दिल व स्वरछंद ग्रुप तर्फे लता मंगेशकर यांना स्वरांजली अर्पण

नगर - जगभरातील कोट्यावधी संगीत प्रेमींना कानांना तृप्त करणारे स्वर आपल्यामध्ये नाही.लता मंगेशकरजींच्या मधुर आवाजाच्या परिसस्पर्शाने अजरामर व प्रसिद्ध झालेल्या गीतांच्या माध्यद्वारे हा स्वर आता अनंतकाळपर्यंत लोकांच्या मनामध्ये गुंजत राहिल. लताजींच्या या आवाजामुळेच भारताचे नाव जगाच्या पाठीवर उमटविले आहे. असे प्रतिपादन संगीतप्रेमी एड.अमीन धाराणी यांनी केले.

गाता रहे मेरा दिल व स्वरछंद कराओके ग्रुपच्यावतीने भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त स्वरांजली गीतांची मैफिलीचे अमीन धाराणी व राजकुमार गुरनानी यांनी सावेडी येथील रावसाहेब पटवर्धन सभागृहात आयोजित केली होती. या प्रसंगी एडवोकेट अमीन धाराणी बोलत होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एड. रविंद्र शितोळे, डॉ. सुदर्शन गोरे, आबीद दुलेखान आदी मान्यवर उपस्थित होते.


lata



या कार्यक्रमात एक प्यार का नगमा है, आके तेरी बाहो मे, चांद ने कुछ कहा, हसता हुआ नूरानी चेहरा, दिल ढूंढता है फिर वही फुरसत के रात दिन, शोखीयों मे घोली जाये थोडीसी शराब, किसी राह मे किसी मोड पर, ओ मेरे सनम ओ मेरे सनम, ये आँखे देखकर हम सारी दुनिया भूल जाते है, जिंदगी कि ना तुटे लडी, हाय रे हाय चैन नही आये, दीदी तेरा देवर दिवाना या सत्तर च्या दशकापासून आजपर्यंतच्या जुन्या व नवीन गायकां सोबत गायलेली अजरामर गीते हेमंत नरसाळे, राजकुमार सहदेव, मनोज जाधव, चंदर ललवाणी, निता गडाख, वंदना जंगम, स्वाती मुदगड, माधुरी सोनटक्के, डॉ. कल्पना ठुबे, दिपा भालेराव, सुनील भंडारी, जयश्री साळवे, नरेश बडेकर, सुनिता धर्माधिकारी, चारु ससाणे, तन्नु महाराज, विधा तन्वर, डॉ. शैलेंद्र खंडागळे, डॉ. सुरेखा घोडके, पुनम कदम, प्रफुल्ल सोनवणे यांनी सादर करून सभागृहाची वाहवाही मिळवून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

सुत्रसंचालन विजय माळी यांनी लता मंगेशकर यांच्या जीवनचर्या चा आढावा घेत उत्तम रीतीने पार पाडले. आभार हेमंत नरसाळे यांनी मानले.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.