अलकरम हॉस्पिटल तर्फे मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन
नगर - स्वतंत्रता सेनानी सरसैय्यद अहमद खान यांच्या जयंतीनिमित्त अलकरम हॉस्पिटलच्या वतीने व आनंदऋषी जी नेत्रालय अहमदनगर यांच्या सहकार्याने रविवार दिनांक 13 अक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 ते 1 वाजे पर्यंत अल-करम हाॅस्पिटल इंगळे मेडिकल मागे किंग्जगेटरोड रामचंद्रखुंट शहादवाल दर्गा समोर अहमदनगर येथे भव्य मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबिराचे तसेच चष्मे अल्पदरा मध्ये देण्यात येणार असल्याची माहिती संयोजक तौफिक तांबोली यांनी दिली.तपासणीसाठी नांव नोंदणी आवश्यक आहे. येताना रुग्णांनी रेशन कार्ड, आधारकार्ड, मतदार ओळखपत्र यापैकी एकाची झेरॉक्सप्रत दोन पासपोर्ट फोटो, घेऊन येणे. शस्त्रक्रिया करण्याचे तपासणी नंतर ठरल्यास रुग्णांना आनंदऋषी मध्ये नेवुन शस्त्रक्रिया केली जाईल.
तरी या संधीचा रुग्नांनी लाभ घ्यावा व नांव नोंदणीसाठी शेरअली शेख यांच्याशी 9921991492, 9860708016 व 02412423333 या नंबर वर संपर्क साधावे असे आवाहन आयोजकां मार्फत करण्यात आले आहे.
Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.