पी.ए. इनामदार स्कूलचे प्राचार्य फिरोसअली मराक्कटील यांना भारत भूषण पुरस्कार प्रदान

पी.ए. इनामदार स्कूलचे प्राचार्य फिरोसअली मराक्कटील यांना भारत भूषण पुरस्कार प्रदान

नगर - आय डी वाय एम फाउंडेशनच्या वतीने सहोदया एडुदोन आणि चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलच्या पुढाकारातून आयोजित भारत भूषण सन्मान पुरस्कार सोहळ्यात इकरा एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या पी. ए. इनामदार स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चे प्राचार्य फिरोसअली मराक्कटील यांना भारत भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी आय डी वाय एम फाउंडेशनचे रविशंकर, चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलचे संचालक संजय चव्हाण,प्राचार्य पूजा, आयकॉनचे प्राचार्या दीपिका नगरवाला आदी मान्यवरांच्या हस्ते फिरोसअली यांचा सन्मान करण्यात आला.

PA Inamdar School, Bharat Bhushan

फिरोसअली मागील अनेक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून अहमदनगर येथील नवाजलेल्या पी.ए. इनामदार शाळेत प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी दिलेले योगदान तसेच सामाजिक कार्य शिक्षणाचा प्रसार अशा अनेक कामांची दखल घेत त्यांना भारत भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.



पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचा इकरा एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे चेअरमन अब्दुल रहीम खोकर, व्हाईस चेअरमन इंजि. इकबाल सय्यद, सचिव विकार काझी, खजिनदार डॉ. खालीद शेख व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.