मख़दुम सोसायटी तर्फे स्वतंत्रता सेनानी सरसैय्यद अहमद खान यांच्या जयंतीनिमित्त बाल साहित्याची पुस्तके वाटप

मख़दुम सोसायटी तर्फे स्वतंत्रता सेनानी सरसैय्यद अहमद खान यांच्या जयंतीनिमित्त बाल साहित्याची पुस्तके वाटप

शिक्षणच विद्यार्थ्यांची दुर्बलता दूर करेल : आबीद खान

sir sayyad ahmedkhan

नगर : आज समाजामध्ये शिक्षणाची दोन भागात विभागणी झाली आहे. एक म्हणजे शासकीय शाळेतील शिक्षण व दुसरे खाजगी शाळेतील शिक्षण. या पद्धतीमुळेच समाजात गरीब व श्रीमंत असे दोन गट निर्माण झाले आहे. दोन्हीकडे शिक्षणाचे तेच धडे आहे, पण सुविधांचा व अनुशासनाचा फरक आहे. शासकीय शाळामध्ये सुविधा व अनुशासनाचा अभाव असल्यामुळे ते खासगी शाळांच्या स्पर्धेत मागे पडत आहे. 


अशावेळी शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांना चांगले व दर्जेदार शिक्षण दिल्यास ते जीवनात यशस्वी होतील आणि हेच शिक्षण त्या विद्यार्थ्यांची दुर्बलता दूर करेल, असे प्रतिपादन मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान खान यांनी केले.


मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्यावतीने स्वतंत्रता सेनानी सरसैय्यद अहमद खान यांच्या जयंतीनिमित्त दर्गादायरा येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना डॉ रिजवान शब्बीर यांच्या वतीने बाल साहित्याची पुस्तके मोफत वाटप आबीद खान यांच्या हस्ते करण्यात आले. 


याप्रसंगी मुख्याध्यापिका शेख यास्मिन अब्दुल अलीम, शेख ताहेरा शिरीन मो. हुसेन, शेख नसीम मो. इब्राहिम,शेख शाकेरा अजीज,शेख नाजनीन, अजीज आदिंसह शिक्षकवृंद उपस्थित होते. मिळालेल्या पुस्तके मुळे विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद दिसत होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख शाकेरा यांनी केले. तर आभार शेख ताहेरा यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.