सबिहा काझी सादिकअली यांना तालुकास्तरावर प्रथम जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त
नगर - महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे २०२३ आयोजित राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत चाँद सुलताना हायस्कूल येथील शिक्षिका सबिहा काझी सादिकअली यांना तालुकास्तरावर विज्ञान विषय ९ वी १० वी गटात व्हिडिओ निर्मितीसाठी प्रथम क्रमांकाचे आणि जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे.
सबिहा काझी सादिक आली यांना यापूर्वी शैक्षणिक क्षेत्रात महत्वपूर्ण कार्य केल्याबद्दल अनेक पारितोषिके मिळाली आहेत.
माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे हस्ते दिखा अॅप तयार केल्याबद्दल, आय सी टी ड्रीम टीचर्स अॅवॉर्ड, सोलापूर येथील व्हिडिओ मेकिंग बद्दल अॅवॉर्ड, बंगळुरू येथील राष्ट्रीय अॅवॉर्ड आणि आदर्श शिक्षिका असे पुरस्कार मिळाले आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन सय्यद हाजी अब्दुल मतीन, व्हा. चेअरमन सय्यद हाजी असगर आणि समद खान, सेक्रेटरी शेख तन्वीर चाँद, जॉइंट सेक्रेटरी सय्यद सादिक अरिफ तसेच शफीक कासमी, शेख नसीर अब्दुल्ला, सय्यद वहाब व शाळेचे मुख्याध्यापक अतिक शेख आदींनी अभिनंदन केले आहे.
Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.