मोहंमदिया एज्यु.सोसायटीत महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री जयंती साजरी
स्वतंत्रता सेनानींचे विचार आचरणात आणले पाहिजे- डॉ.प्रा.सलाम सर
नगर - देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी यांचे फार मोठे योगदान आहे. सत्य आणि अहिंसेचा संदेश जगाने अंगिकारला आहे. आजही अनेक जगात होणार्या क्रांती या महात्मा गांधी यांच्या सत्यग्रहावर आधारित असतात. तसेच लालबहादूर शास्त्री यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून देशाला प्रगती पथावर नेण्याचे काम केले आहे. अशा महान देशभक्त व्यक्तीमत्वांचे विचार आपण आचरणात आणले पाहिजे, असे प्रतिपादन मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह डॉ.प्रा. अब्दुस सलाम सर यांनी केले.
मोहंमदिया एज्युकेशन सोसायटी संचलीत सावित्रीबाई फुले उर्दु प्राथमिक कन्या शाळा, मौलाना आझाद उर्दु मुलींचे हायस्कुल, मदर तेरेसा उर्दु ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स् अॅण्ड सायन्स् फॉर गर्ल्स, मासुमिया डी.एल.एड्.कॉलेज (उर्दु माध्यम) व मासुमिया शिक्षणशास्त्र महाविद्यालय, मुकुंदनगर, अहमदनगर येथे महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
संस्थेचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा. डॉ.शेख अब्दुस सलाम सर यांनी महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. प्रमुख पाहुणे म्हणुन सय्यद फरीदा भाभी, संस्थेचे उपसचिव शेख अ.अजीज अ.रहेमान, मुख्याध्यापक सय्यद नौशाद, संचालक नसीर अब्दुला , हसीब शेख, शेख शाहीन, शेख फरजाना, शेख सुलताना, शेख मुमताज, शेख यास्मिन व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असलम पटेल यांनी केले.तर आभार शेख हीना यांनी मानले.
Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.