गांधी जयंतीनिमित्त चांदबिबी महाल येथे स्वच्छता मोहीम व युवा जनजागृती
अहमदनगर- महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक, जमीर भाई फ्रेंड सर्कल आणि युथ कराटे फेडरेशनच्या वतीने अहमदनगरच्या चांदबिबी महाल परिसरात स्वच्छता मोहीम व युवा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह स्थानिक युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
स्वच्छता मोहिमेअंतर्गत चांदबिबी महाल परिसराची स्वच्छता करण्यात आली. सहभागी युवकांनी परिसरातील कचरा उचलून परिसर स्वच्छ केला. या कार्यक्रमाचा उद्देश समाजात स्वच्छता, शिस्त आणि गांधीजींच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणे हा होता.
कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते जमीर भाई फ्रेंड सर्कलचे सदस्य शाहरुख खान, मुनाफ सय्यद, प्रशिक्षक सबील सय्यद, सहील सय्यद आणि युथ कराटे अकॅडमीचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी जमीर भाई शेख यांची चिमुकली मुलगी मदिहा शेख हिने "हदिस तंजफु फइनल इस्लामा नजीफून" या हदीसचे पठण केले, ज्याचा अर्थ "स्वच्छ रहा कारण इस्लाम हा स्वच्छ धर्म आहे." या पठणाद्वारे तिने इस्लाम धर्मात स्वच्छतेला किती प्राधान्य आहे, हे पटवून दिले.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहात झाले आणि युवकांनी स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात महत्वपूर्ण योगदान दिले.
Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.