चांद सुलताना हायस्कुल मध्ये गांधी जयंती साजरी
महात्मा गांधीनी 'अहिंसा परमो धर्म' चा संदेश जगाला दिला - सैय्यद मतीन
नगर - राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी 'अहिंसा परमो धर्म' या तत्वाखाली देशवासियांना संघटित करून स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले. सत्य व अहिंसेच्या मार्गाने भारताला आत्मनिर्भर होण्याची दिशा दाखविली असे प्रतिपादन ए. टी. यु. चांद सुलताना हायस्कुलचे अध्यक्ष सय्यद हाजी अब्दुल मतीन अब्दुल रहीम यांनी केले.ए.टी.यू. चाँद सुलताना ऍंग्लो उर्दू हायस्कुल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज अहमदनगर येथे गांधी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सय्यद हाजी अब्दुल मतीन अब्दुल रहीम, उपाध्यक्ष सय्यद असगर अकबर, सचिव शेख तन्वीर चांद, सदस्य शेख गुलाम दस्तगीर अब्दुल गणी,शेख फय्याज राज मोहम्मद, मुख्याध्यापक शेख अतिक कादर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संस्थेचे सर्व पदाधिकारयांनी विध्यार्थायांना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनीही यावेळी आपल्या वक्तृत्वातून महात्मा गांधी यांच्या जीवनाच्या वेगवेगळ्या घटनांवर प्रकाश टाकला. शेवटी शादाब शेख यांनी आभार मानले.
Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.