आंतरराष्ट्रीय संगीत परिक्षेत ग्रेस म्युझिक अकॅडमीचे यश
शनिवार दि.7 डिसेंबर 2024 रोजी वार्षिक म्युझिकल उत्सवाचे आयोजन
नगर - लंडन येथील ट्रीनिटी कॉलेजच्या वतीने घेण्यात आलेल्या परिक्षेत नगरमधील ग्रेस म्युझिक अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले.
अशिता लोखंडे, ईशा बडवे,व ॲरन पंडीत यांनी इलेक्ट्रॉनिक कि-बोर्ड ग्रेड-2, तसेच भार्गवी ढोके, ओजस राऊत ग्रेड इलेक्ट्रॉनिक कि-बोर्ड ग्रेड -1, चैतन्य गंधे, कौस्तुभ पवार, दक्ष कुलकर्णी, नोएल पंडीत,शालमली साके,भूमिका थापा, शलमोन पहिलवान, प्रज्ञेश कुलश्रेष्ठा, अंजली शितोळे, केवीन सोनावने, सई पटारे, शुभंकर पटारे, प्रतिम काकडे, अमोल दळवी, अभिषेक पोळ, जोएल लोखंडे, हर्षदा गायकवाड, ईरा बड़वे इलेक्ट्रॉनिक कि-बोर्ड इनिशियल ग्रेड तसेच ओंकार राऊत प्लॅकट्रम गिटार ग्रेड-1,व अँजेलो थोरात, जयालक्ष्मी ढबाळे,ॲरन पंडीत प्लॅकट्रम गिटार इनिशियल ग्रेड यांनी या परिक्षेत गुणवत्तापूर्वक यश संपादन केले.
ग्रेस फाऊंडेशनच्या ग्रेस म्युझिक अकॅडमीच्या वार्षिक म्युझिकल उत्सवाचे शनिवार दिनांक 7 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता माऊली संकुल झोपडी कॅंन्टीन सावेडी, अहिल्यानगर,अहमदनगर येथे आयोजन करण्यात आले असल्याचे ग्रेस म्युझिक ॲकॅडमीचे डायरेक्टर पिटर पंडीत सर यांनी कळविले आहे.
या म्युझिकल उत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर करुणा शेंडे, ऑग्जिलियम कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका सिस्टर निलिमा रॉड्रिग्ज,सेंट मायकल स्कूलच्या मुख्याध्यापिका नाँदिता डिसोझा, ज्ञानसंपदा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका शिवांजली अकोलकर, ग्रेस फाउंडेशनचे सेक्रेटरी लिओ पंडीत हे असणार आहे. या कार्यक्रमात ग्रेस म्युझिक ॲकॅडमीचे विद्यार्थी नवीन जुने हिंदी, मराठी, इंग्रजी गीते सादर करतील. सर्वांना प्रवेश विनामूल्य आहे.
लकी ड्रॉ द्वारे प्रेक्षकांसाठी भरपूर बक्षीसेही दिली जाणार आहे. तरी या वार्षिक म्युझिकल उत्सवामध्ये संगीत रसिकांनी व अहिल्यानगरकरांनी उपस्थित राहून याचा आनंद घ्यावा. असे आवाहन सोनाली पिटर पंडीत मॅडम यांनी केले आहे.
Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.