बांगलादेशातील हिंदूं अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार त्वरित थांबविण्यासाठी भारत सरकारने पुढाकार घेण्याची मख़दुम सोसायटीची मागणी
नगर - बांगलादेशातील हिंदुंवर होणारे हल्ले, खून, लूटमार, जाळपोळ, अमानुष अत्याचार हे अत्यंत चिंताजनक व मानवतेला काळीमा फासणारे आहेत. मखदूम एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी याचा निषेध करते.हे थांबवण्याऐवजी सध्याचे बांगलादेश सरकार केवळ मूक प्रेक्षक राहिले आहे. लोकशाही मार्गाने उठलेला आवाज दाबण्यासाठी बांगलादेशातील हिंदूंवर बळजबरी, अन्याय आणि अत्याचार केले जात आहेत.
मखदुम एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी अहमदनगर भारताच्या पंतप्रधानांना विनंती करते की त्यांनी जागतिक पातळीवर भारताच्या संबंधाचा वापर करून बांग्लादेश सरकार वर दबाव टाकून बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी बांगलादेश सरकारला तातडीने कठोर पावले उचलण्यासाठी भाग पाडावे. आणि बांगलादेशातील हिंदू आणि इतर सर्व अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी प्रयत्न करावे. आणि भारत सरकारला विनंती आहे की बांगलादेशातील पीडितांच्या पाठीशी उभे राहून त्यांना पाठिंबा द्यावा.अशी मागणी मेलद्वारे मख़दुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान यांनी पंतप्रधान भारत सरकार कडे केली आहे.
Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.