मातोश्री उर्दू हायस्कुल व अल्हाज अ.अजीज उर्दू ज्युनियर कॉलेजच्या क्रीडा स्पर्धा संपन्न
आलमगीर येथील अलफ्लाह एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी अहमदनगर संचलित मातोश्री उर्दू हायस्कुल व अजीज उर्दू ज्युनिअर कॉलेज येथे संस्थेचे सभासद शेख हसीब यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. या स्पर्धे मध्ये 8 वी तें 12 वी पर्यंत च्या विधार्थांनी भाग घेतला.स्पर्धे मध्ये डॉजबॉल, थ्रोबॉल, धावणे, गोळाफेक, थाळीफेक, लिंबू चमचा आदी स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतील विजय विद्यार्थ्यांना संस्थेचे सभासद शेख मेहनाज सलाम व शेख हाजी अजीज रहेमान जनाब यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली.
स्पर्धा यशस्वि करण्यासाठी मुख्यध्यापक शेख जमीरअहमद इस्माईल, शेख एजाज अ. कुदडूस, शेख मुजम्मील हाफिज, खान सफिया सलीम शेख, अंजुम सत्तार, खान निशात सोहिल, शेख आफ्रीन शफिउद्दीन, तांबोळी नसरीन मुबीन तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी भरपूर परिश्रम घेतले.
Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.