सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळेत सावित्रीबाईनां अभिवादन

सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळेत सावित्रीबाईनां अभिवादन


नगर - मोहम्मदीया एज्युकेशन सोसायटीच्या सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळेत महाराष्ट्राच्या आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 

Savitribai Phule Urdu Girls School Salutations to Savitribai


सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा. डॉ.अब्दुस सलाम सर, मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आबिद दुले खान,मुख्याध्यापक नौशाद सैय्यद, यास्मिन शेख, फरजाना शेख, शाहीन शेख, काझी मुमताज आदी उपस्थित होते. 


कार्यक्रमाची सुरुवात हम्द, नात व कुराण पठणाने झाली. प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक नौशाद सैय्यद यांनी कार्यक्रमाचे उद्देश व शिक्षणाचे महत्त्व याविषयी विचार व्यक्त केले. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर शेख युसरा अझहरुद्दीन, शेख फातिमा फिरोज, मिर्झा फातिमा मुनाफ, शेख फातिमा हिमायुद्दीन, शेख रुखसाना इरशाद, शेख मसीरा तन्वीर, अतार साॅलेहा आमिर व तांबोळी जिक्रा मुबीन या विद्यार्थिनींनी वक्तृत्वाद्वारे मांडले.


प्रा.डॉ.सलाम सर यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाई फुले नसत्या तर आज
मुली शिक्षण घेऊ शकले नसत्या. सावित्रीबाई यांनी शिक्षणासाठी जे कष्ट घेतले त्या कष्टातून आज मुलींना शिक्षणाची दारे खुली झाली आहे. त्यामुळे मुली शिक्षण घेऊन उच्चशिक्षित होत आहेत. शिक्षणामुळे कुटुंबाची व समाजाचा विकास चांगल्या पद्धतीने घडविण्याचे योगदान महिलांच्या हाती दिलेले आहे. त्यामुळे आज उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या खूप वाढलेली आहे अशा पद्धतीने त्यांनी अतिशय मार्मिक व वैचारिक विचार विद्यार्थ्यांना सांगितले.



आबीद दुलेखान यांनी आपल्या मनोगतातून महिलांना शिक्षणातून सक्षमीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून नेहमी प्रयत्न केला जातो व महिलांनी शिक्षणाचा उपयोग स्वतःसाठी मर्यादित न करता कुटुंबासाठी व समाजासाठी सुद्धा त्याचा उपयोग झाला पाहिजे याविषयी विचार व्यक्त केले.
सूत्रसंचालन शेख सुलताना यांनी केले. आभार असलम पटेल यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.