सरसैय्यद अहमद खान उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक गाणी, नाटके आणि संवाद सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली
नगर - सामाजिक सभ्यता आणि तिची संस्कृती वाढविण्या साठी अलफलाह एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी नेहमीच सक्रिय असते आणि संस्थेच्या सर सय्यद अहमद खान उर्दू प्राथमिक शाळेच्या माध्यमातून त्याचे चांगले परिणाम समाजात स्पष्टपणे दिसून येत आहेत. आणि पालक त्यांच्याबद्दल समाधानी आहेत. भविष्यात ही संस्था व शाळा आणखी उंची प्रस्थापित करेल, अशी अपेक्षा संस्थेचे प्रमुख कार्यवाह प्रा.डॉ. अब्दुस सलाम सर यांनी व्यक्त केली. आणि कार्यक्रमाला उच्च व दर्जेदार म्हणत शुभेच्छा दिल्या.अलफलाह एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी संचलित सर सय्यद अहमद खान उर्दू प्राथमिक शाळा आलमगीर अहमदनगर मध्ये स्नेहसंमेलनानिमित्त मुलांच्या वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मोहम्मदीया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा.डॉ. अब्दुस सलाम, शबाना तांबोली, विश्वस्त शेख मेहनाज, हसीब शेख, यास्मिन शेख, अजीज सर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे शबाना शेख यांनी आपल्या मनोगतातून प्रा.डॉ अब्दुस सलाम सर यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम, धाडस आणि हिंमत यातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढवता येईल यावर मार्गदर्शन केले. नंतर विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक,आणि देशभक्तीपर विषयांवर आधारित गाणी, नाटके आणि संवाद अतिशय रंजक पद्धतीने सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.सोशल मीडियाचे तोटे, स्कुल चले हम, हा भारत आमचा, गंतव्याच्या पलीकडे वाटचाल, अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने सादर केले. सुत्रसंचालन शेख अफसाना यांनी केले.
आभार साकीन सर यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शेख अफसाना, शेख शबाना, शेख जायदा, शेख जोहरा, परवीन बुशरा यांनी परिश्रम घेतले. यावेळी पालक वर्ग ही आपल्या मुलांचे धाडस वाढवण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.