दारुल उलूम रज़ा ए मेहबूबमध्ये प्रजासत्ताक दिवस देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या वातावरणात जल्लोषात साजरा
नगर - प्रजासत्ताक दिन हा दारुल उलूम रज़ा ए मेहबूब येथे मुख्य मैदानावर ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला. यावेळी मदरसातील विद्यार्थी गणवेशात शिस्तबद्ध रांगा लाऊन मोठ्या संख्येने उत्साहात शामिल झाले होते. मदरसाच्या मुख्य मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे राज्य उपाध्यक्ष सय्यद साबीरअली यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी मुफ्ती शाहजहां कादरी रज़वी व उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छापर मार्गदर्शन केले.मदरसातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय देशप्रेमावर आधारित गीत सादर केले. मदरशामधील विद्यार्थ्यांना मिठाई वाटपाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
याप्रसंगी नगरसेवक आसिफ सुल्तान, सामाजिक कार्यकर्ते सय्यद रियाज़, मोहम्मद मुबीन वलीयोद्दीन शेख, खत्मे कादरीया ग्रूपचे सर्व सदस्यसह मुकुंदनगर भागातील काही ज्येष्ठ नागरिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे विश्वस्त खलिफा ए मन्सूरे मिल्लत हाजी शेख बाबर चाँद कादरी रज़वी मेहबूबी रब्बानी, शेख नदीमभाई कादरी रज़वी, शेख रफिक केडगाव, सय्यद अलीमुद्दीन, शेख तहनूर कादरी, मौलाना शाहीद कादरी रज़वी, मुन्शी मामू, नदीम रज़ा, अदीब शेख, आफताब शेख, अरबाज़ बागबान, सय्यद अबूज़र, रेहान शेख रिक्षावाले इत्यादींनी प्रयत्न केले.
Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.