डोंगरे बहुद्देशीय संस्थेचा डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राज्यस्तरीय ग्राम गौरव पुरस्कारने सन्मान

डोंगरे बहुद्देशीय संस्थेचा डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राज्यस्तरीय ग्राम गौरव पुरस्कारने सन्मान

जळगावमध्ये झाला संस्थेच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रातील कार्याचा गौरव

नगर - सामाजिक, कला, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रात निस्वार्थ भावनेने उत्कृष्ट काम करणाऱ्या नगर जिल्ह्यातील स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेला जळगावातील  टीएन. हेल्प मल्टीपर्पज सोसायटीच्यावतीने डॉ. एपीजे. अब्दुल कलाम राज्यस्तरीय ग्रामगौरव पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला.

dongre, ahmednagar, nagar, abdul kalam


महाराष्ट्र टिचर्स असोसिएशन यांच्या राज्य अध्यक्ष आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील आणि जळगावचे प्रशासन अधिकारी खलील शेख यांच्या हस्ते डोंगरे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पै.नाना डोंगरे यांना सदर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी जिल्ह्याचे शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, फारुक शेख, धुळे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विवेक सुर्यवंशी, डी.बी. पाटील, सोसायटीचे अध्यक्ष डॉ. जावेद शेख, फारुख शाह नौमानी आणि अनिता चौधरी आदींसह विविध क्षेत्रामधील मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था नगर तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध क्षेत्रात कार्य करत आहे. संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य सुरु आहे. 


ग्रामीण भागात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासाठी विविध कार्यक्रम घेऊन संस्थेने पर्यावरण संवर्धनासाठी मोठी जनजागृती केली आहे. स्त्री जन्माचे स्वागत, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, मतदार जागृती, जलसंधारण जागृती मोहिम व रक्तदान शिबीर व्यापक स्वरुपात राबविण्याचे कार्य सुरु आहे. तसेच युवकांसाठी व्यसनमुक्तीवर विविध उपक्रम घेऊन जनजागृती केली जात आहे.


आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गावपातळीवर ग्रामस्थांना आधार देण्याचे कार्य सुरु आहे. विविध स्पर्धा, महिला बचत गट मेळावे, काव्य व युवा संमेलन घेऊन समाजाला दिशा देण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून सुरु आहे. या कार्याची दखल घेऊन डोंगरे संस्थेला स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेला डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राज्यस्तरीय ग्राम गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!