सायखिंडी येथील सह्याद्री देवराई डोंगराला लागली अचानक आग

सायखिंडी येथील सह्याद्री देवराई डोंगराला लागली अचानक आग 

अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात

संगमनेर - संगमनेर तालुक्यातील सायखिंडी येथील सह्याद्री देवराई डोंगराला अचानक आग लागली. दुपारी लागलेल्या या आगीने सर्व दूर धुर पसरला.दुपारी उन्हाचा तडाखा असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले मात्र सहकार महष भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणल्याने डोंगरावरील झाडे आगीच्या तडाख्यातून वाचली. 


aaj, sangamner




सायखिंडी येथील डोंगरावरूनच सहकार महष भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून दंडकारण्य अभियानाची सुरूवात झाली होती. या परिसरात ज्येष्ठ सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई संस्थेनेही मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे हा डोंगर झाडांच्या हिरव्या शालूने नटलेला असताना रविवारी  दुपारी या डोंगराला अचानक आग लागली.लागलेल्या आगीला नियंत्रणात आणण्यासाठी थोरात कारखान्याच्या अग्निशामक दलाने तत्परता दाखवल्याने ही आग तातडीने आटोक्यात आली.



लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महष भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने तालुक्याचे हृदय म्हणून काम करताना सातत्याने विकासामध्ये योगदान दिले आहे. याचबरोबर सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने पुढाकार घेतला आहे. सहकार महष भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेले दंडकारण्य अभियान ही पर्यावरणाची मोठी लोक चळवळ झाली आहे. वृक्षारोपण व संवर्धनाचे मोठे काम या चळवळीच्या माध्यमातून दरवष होत आहे.



उन्हाळ्यामध्ये अनेक डोंगरांवर नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे किंवा इतर कारणांमुळे आग लागते आणि त्यातून नैसर्गिक आणि जीवसृष्टीसह वृक्षांची मोठी हानी  होते. अशा आगी लागू नयेत याकरता दंडकारण्य अभियान समितीच्या वतीने जनजागृती सातत्याने सुरू असते. 



रविवारी दुपारी सायखिंडी येथील सह्याद्री देवराई डोंगरावर लागलेल्या आगीची बातमी कळतात सहकार महष भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी मोठ्या तत्परतेने ही आग विझवली. यासाठी कारखान्याने मोठी मदत केली. यामुळे जंगलाचा मोठा भाग वाचवण्यात यश आले असून जीवसृष्टी व पर्यावरणाची हानी टळली आहे.



वनविभागाचे स्थानिक कर्मचारी आणि कारखान्याच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या तत्परतेच्या कामाबद्दल लोकनेते बाळासाहेब थोरात,माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे, आमदार सत्यजित तांबे डॉ.जयश्री थोरात, बाबा ओहोळ, इंद्रजीत थोरात,  संतोष हासे, सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी अभिनंदन केले आहे.



सह्याद्री देवराईच्या उभारणीसाठी सिने अभिनेते सयाजी शिंदे,  सह्याद्री देवराईचे प्रणेते सिताराम राऊत व इतर कार्यकर्ते व वनविभागाचे कर्मचारी यांनीही अत्यंत मोलाचे काम केले आहे. कारखान्याने केलेल्या तत्परतेच्या मदतीबद्दल सिताराम राऊत यांच्यासह सायखिंडी परिसरातील नागरिकांनी  कारखाना व अग्निशामन दलाचे आभार व्यक्त केले आहे.







Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!