आषाढ पौर्णिमा ( वर्षवास प्रारंभ) निमित्त बुध्दवंदना व सन्मान सोहळा संपन्न
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून तथागत बुद्धिस्ट सोसायटी इंडिया व क्रांतीसुर्य बहुउद्देशीय प्रतिष्ठान च्या वतीने २२ बौद्ध उपासकांचे सन्मान.
नगर (प्रतिनिधी)- आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालखंडामध्ये अहिल्यानगर शहरांमध्ये बुद्ध अँड हीस धम्मा या धम्मग्रंथाचे प्रबोधन पर्व सुरू करण्यात येते यावर्षी या प्रबोधनाची सुरुवात टिळक रोड येथिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथून होणार आहे तसेच या समारंभात "बुद्धगया दर्शन घेऊन आलेले २२ बौद्ध उपासकांचे स्वागत तथागत बुद्धिस्ट सोसायटी इंडिया क्रांतीसुर्य बहुउदेशय प्रतिष्ठान अहिल्यानगर यांच्या वतिने सन्मान करण्यात आले यावेळी सर्वानी आपले मनोगत व्यक्त केले.
तर तथागत बुध्दिस्ट सोसायटी इंडिया चे अध्यक्ष आयु. संजय कांबळे यांनी आपल्या भाषणात गुरु पर्णिमाचे म्हतव सांगितले तथागत बुध्द यांनी आपले पाच मित्र जे वैरागी जिवना मध्ये सिध्दार्थ बरोबर होते ह्या पाच मित्रांना जिवन जगण्याचा सत्याचा मार्ग आषाढी पौर्णिमा दिवशी पंचशील व पहिले प्रवचण दिले तेंव्हा पासुन गुरु आणि शिश्श पंरमपरा चालु झाली आज पासुन धम्म श्रवन केली.
तीन महिने ग्रंथाचे वाचन करुन अश्विन पौर्णिमा पंर्यत वर्षावास संपतो ही सर्व माहिती दिली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. दिलीप गायकवाड, किरणजी साळवे, भाऊसाहेब आव्हाड, प्रकाश थोरात, शशिकांत घोडके, प्रा. विश्वासराव कांबळे, डॉ. भास्कर रणनवरे, रवींद्र कांबळे, भाऊसाहेब देठे, मोहन शिरसाट, प्रकाश पगारे, अशोक मोरे, एल. एम. जाधव, प्रा. विलास साठे, बापूसाहेब भिंगारदिवे, छाया शिरसाठ, रमेश पगारे आदी मान्यवरांच्या हस्ते संतोष ढगे, संस्कृती ढगे, मंगल हंबर्डे, गौरम कदम, हेमलता कदम, कृपा कदम, भाऊसाहेब भातकुडव, जोस्ना पठारे, प्रमिला पानपाटील, सुनीलदत्त स्वामी, लक्ष्मी आल्हाट, विजय आल्हाट, अनिल आंबावडे, उज्वला आंबावडे यांचा गौरव करून स्मृतिचिन्ह देण्यात आले.
यावेळी थायलंड येथे ४० दिवस ध्यान साधना करून आलेले प्रशांत रामचंद्र बोरुडे, संदीप वाघमारे, भाऊसाहेब देठे, मोहन शिरसाट यांचाही सत्कार तथागत बुध्दिस्ट सोसायटी इंडिया या संस्थेच्या वतिने करण्यात आला यावेळी प्रा. डॉ. विलास खरात यांनी गरु पौर्णिमा निमित्त सनातनो धम्मा विषयी महिती दिली व बौध्द गया येथिल अतिक्रम बद्दल व बौध्द धम्मा बदल मार्गदर्शन केले कार्य क्रमाचे सुत्र संचलन आयु संजय कांबळे यांनी केले आभार भाऊसाहेब देठे यांनी मानले.

