प्रकाश नेत्रालयात गुरुपौर्णिमेनिमित्त ज्येष्ठ रुग्णांचा सन्मान
ज्येष्ठ नागरिकांची घरी जाऊन नेत्र तपासणी प्रकाश नेत्रालयाचा स्तुत्य उपक्रम. मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.
नगर- प्रकाश नेत्रालयात कै. डॉ प्रकाश चिटगोपेकर तसेच कु.आरती चिटगोपेकर यांच्या २७व्या स्मृतिदिन व गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या शिबीरामध्ये डोळ्यांची तपासणी करुण औषधोपचार करण्यात आले. नेत्र शस्त्रक्रिया तसेच लेसीक उपचार पद्धतीवर खास सवलत देण्यात आली असल्याची माहिती डॉ.राजीव चिटगोपेकर यांनी दिली. चिटगोपेकर नेत्रालयाच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित नेत्रदान शिबिराप्रसंगी वयोवृद्ध गुरुतुल्य ज्येष्ठ रुग्णांची नेत्र तपासणी करून त्यांचा रुग्णालयाच्या वतीने प्रकाश नेत्रालयाचे नेत्रतज्ञ डॉ. राजीव चिटगोपेकर यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी अशोक तोरडमल,शगुफ्ता शेख ,बाबासाहेब मोहिते, जालिंदर दुतारे. आदी उपस्थित होते.
प्रकाश नेत्रालयाच्या वतीने वेळोवेळी सामाजीक भावनेतून विविध सामाजीक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.आतापर्यंत नेत्र शिबिराच्या माध्यमातून अनेक सर्वसामान्य रुग्णांना त्याचा फायदा झाला आहे. वडील नेत्रतज्ञ कै.डॉ. प्रकाश चिटकोपेकर यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक सर्वसामान्य रुग्णांची सामाजिक भावनेतून सेवा केली गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांनी केलेल्या कामाची त्यांना गुरुदक्षिणा म्हणून जे ज्येष्ठ नागरिक बाहेर पडू शकत नाहीत.
त्यांना रुग्णालयात आणण्यासाठी कोणी नाही अशा रुग्णांसाठी प्रकाश नेत्रालयाच्या वतीने घरपोच जाऊन त्यांची नेत्र तपासणी करून ओशोधोपचार करण्याचा स्तुत्य उपक्रम प्रकाश नेत्रालयाच्या वतीने राबविण्यात येत आहे. आत्तापर्यंत जवळपास दोनशे रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे. ज्यांना रुग्णालयात येण्यासाठी अडचण आहे . अशा रुग्णांनी रुग्णालयाच्या .9420461117 या नंबर वर संपर्क साधावा. असे आव्हान यावेळी डॉ .चिटकोपेकर यांनी केले.

चिटगोपेकर नेत्रालयाच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित नेत्रदान शिबिराप्रसंगी वयोवृद्ध गुरुतुल्य ज्येष्ठ रुग्णांची नेत्र तपासणी करून त्यांचा रुग्णालयाच्या वतीने प्रकाश नेत्रालयाचे नेत्रतज्ञ डॉ. राजीव चिटगोपेकर यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अशोक तोरडमल,शगुफ्ता शेख ,बाबासाहेब मोहिते, जालिंदर दुतारे. आदी उपस्थित होते.(छाया. समीर मन्यार)
