रुग्णांसमोर डॉक्टर देवरूपाने उभा राहतो- पोलीस अधीक्षक, सोमनाथ घार्गे
नोबल हॉस्पिटल येथे डॉक्टर डे रक्तदान शिबिराने साजरा पोलीस अधीक्षकांनीही बजावला रक्तदानाचा हक्क
नोबल हॉस्पिटल येथे रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाउन व एशियन नोबल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर डेनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराप्रसंगी रक्तदान करताना पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यावेळी नोबलचे मेडिकल डायरेक्टर डॉ.बापूसाहेब कांडेकर ,रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. विनोद मोरे ,आयएमएचे अध्यक्ष सी डी मिश्रा, क्लबचे सचिव महेश गोपालकृष्णन, नोबलच्या संचालिका डॉ. संगीता कांडेकर, सीईओ विजय निकम ,डॉ. ज्योत्स्ना डौले, डॉ. रेणुका पाठक, अदींसह शहरातील डॉक्टर्स व रोटरीयन मोठ्या संख्येने उपस्थित होते.(छाया समीर मन्यार)
नगर : रुग्णांनी डॉक्टरांना देवाची उपमा दिली आहे. देवरूपाने रुग्णांसमोर डॉक्टर उभा राहतो. जेव्हा रुग्ण रुग्णालयातून बरा झाल्यानंतर हसतमुखाने बाहेर पडतो तेव्हा तो देवाबरोबर ज्याने आपल्याला जीवदान दिले आहे त्याचेही आभार मानतो. रुग्ण सेवा हे एक पुण्याचं काम आहे त्याचबरोबर रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे .वेळेत रक्त मिळालं नाही तर आयुष्य गमाव लागतं. जेव्हा रुग्णाला रक्ताची गरज लागते तेव्हा जात धर्म पहिला जात नाही फक्त रक्तगट पाहिला जातो ही देवाची देणगी आहे. ही देवाची किमया असल्याचे म्हणत सर्व डॉक्टरांना डॉक्टर डेनिमित्त व शेतकरी बांधवांना शेतकरी दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
नोबल हॉस्पिटल येथे रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाउन व एशियन नोबल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर डेनिमित्त आयोजित रक्तदान शिबाराच्या कार्यक्रमाप्रसंगी श्री घार्गे बोलत होते .याप्रसंगी नोबलचे मेडिकल डायरेक्टर डॉ.बापूसाहेब कांडेकर ,रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. विनोद मोरे ,आयएमएचे अध्यक्ष सी डी मिश्रा, क्लबचे सचिव महेश गोपालकृष्णन, नोबलच्या संचालिका डॉ. संगीता कांडेकर, सीईओ विजय निकम ,रोटरीचे माजी अध्यक्ष अजय पिसोटे रो. प्रमोद पारिख, किरण कालरा ,राहुल हिरे ,डॉ. सुजाता उबाळे ,टीना इंगळे ,रो. प्रताप पांडे, डॉ. ज्योत्स्ना डौले, डॉ. रेणुका पाठक, सम्राट निकम ,अदींसह शहरातील डॉक्टर्स व रोटरीयन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. बापू कांडेकर म्हणाले की एक जुलै चे महत्व इतर दिवसांपेक्षा वेगळ आहे .डॉक्टर बी सी रॉय एक फिजिशियन होते. डॉक्टर की च्या माध्यमातून त्यांनी मोठी समाजसेवा करण्याचे महान कार्य केलं. त्यांना आदरांजली म्हणून हा दिवस साजरा केला जातो. आलेला रुग्ण कसा बरा होईल हसत रुग्णालयाच्या बाहेर जाईल हे ध्येय प्रत्येक डॉक्टरांचे असते त्यांच्या जीवनात आनंद देण्याचे काम डॉक्टर्स मंडळी करत असतात डॉक्टरांना जर देव म्हणत असाल तर तो एक माणूस असल्याचे सांगत रक्तदानाचे आयुष्यातील महत्त्व त्यांनी यावेळी विशद केले.
यावेळी पोलीस अधीक्षकांसह सर्व डॉक्टर्स , महिला डॉक्टर्स व रोटरियन यांनी आपला रक्तदानाचा हक्क बजावला. कार्यक्रमाचे नियोजन हॉस्पिटलचे व्यवस्थापक डॉ. विश्वजीत मोरे यांनी केले सूत्रसंचालन सीईओ विजय निकम यांनी केले तर आभार रो. महेश गोपालकृष्णन यांनी मानले.

