अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसीची निकिता शिंदे हिचा फार्मोत्सवात सन्मान

अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसीची निकिता शिंदे हिचा फार्मोत्सवात सन्मान

नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन, पुणे व सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स यांच्या संयुक्त विद्यमाने मॅन्युफॅक्चरिंग स्पर्धा २३ व्या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत २ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली. यामध्ये अरीहंत कॉलेज ऑफ फार्मसी, अहिल्यानगर येथील द्वितीय वर्षाची विद्यार्थीनी निकिता शिंदे हिने ७७.४६% गुण मिळवून अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये प्रथम क्रमांक मिळवला.
तिला या उल्लेखनीय यशाबद्दल सन्मानचिन्ह (चषक)  देऊन गौरविण्यात आले.




तिला हा  सन्मान श्रीजय पाटील (सदस्य, फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, दिल्ली) व डॉ. डी. बी. जाधव (संचालक, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.


या प्रसंगी प्राचार्य डॉ. योगेश बाफना  यांनी सांगितले की, या यशात महाविद्यालयाच्या सर्व शिक्षकांचे मोलाचे योगदान आहे. प्रा. माधुरी पवार प्रा. प्रतीक्षा गांधी, प्रा.वृषाली गायकवाड,  प्रा. शितल खंडागळे यांचे मार्गदर्शन लाभले व सर्व सहकाऱ्यांनी निकिता शिंदे हिचे अभिनंदन केले.


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!